जोस बटलरने विराट कोहलीला मागे टाकले, तर टी-20 मध्ये ‘या’ बाबतीत रोहित शर्माची बरोबरी केली

Published:
जोस बटलरने विराट कोहलीला मागे टाकले, तर टी-20 मध्ये ‘या’ बाबतीत रोहित शर्माची बरोबरी केली

इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुद्ध चेस्टर ली स्ट्रीट येथे झालेल्या 3 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम  बॅटिंग करताना जॉस बटलर यांच्या 96 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडीज संघाने या आव्हानाचा पाठलाग करताना 20 ओव्हर्समध्ये केवळ 167 धावांपर्यंत मजल मारली.

बटलरने कोहलीला मागे टाकलं

वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात टॉस जिंकून बॅटिंग करताना इंग्लंड संघाने पहिली विकेट 16 धावांवर गमावली. त्यानंतर नंबर 3 वर बॅटिंग साठी आलेल्या जॉस बटलरने जेमी स्मिथ सोबत दुसऱ्या विकेट साठी 79 धावांची शानदार भागीदारी केली. बटलरने आपल्या 96 धावांच्या खेळीत 59 बॉल्स खेळल्या ज्यात त्यांनी 6 फोर्स आणि 4 सिक्सेस लगावले.

याचबरोबर टी२० इंटरनॅशनल मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जॉस बटलर ने विराट कोहली ला मागे टाकले आहे. विराट कोहलीने आपल्या टी२० इंटरनॅशनल करिअरमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध एकूण 570 धावा केल्या आहेत, तर आता बटलर च्या नावावर 611 धावा जमा झाल्या आहेत. या यादीत रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी विंडीज विरुद्ध 693 धावा केल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 2 सामन्यांमध्ये बटलरला टॉपवर पोहोचण्याची संधी आहे.

बटलरने रोहितच्या या रेकॉर्डची केली बराबरी

जॉस बटलर ने वेस्ट इंडीज विरुद्ध टी20 इंटरनॅशनल मध्ये सर्वाधिक हाफ सेंच्युरीज झळकावण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्याशी बरोबरी केली आहे. रोहित आणि बाबर दोघांनीही विंडीज विरुद्ध 5-5 अर्धशतकं  केली आहेत. आता या यादीत बटलर देखील सामील झाला आहे. तर पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया चा माजी खेळाडू डेविड वॉर्नर आहे, ज्याने विंडीज विरुद्ध एकूण 7 अर्धशतकं  केली आहेत.