भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्माला बीसीसीआयने वनडे सामन्याच्या कर्णधार पदावरून काढून टाकले आणि त्याच्या जागी नवख्या शुभमन गिलला एकदिवसीय सामन्याचा कर्णधार बनवले. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. ज्या रोहित शर्माने भारतीय क्रिकेटला त्याचे सर्व काही दिले. एक नवा संघ तयार केला, 2 आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या, त्या रोहित शर्माला कर्णधार पदावरून का काढलं?? असा सवाल क्रिकेट विश्वातून विचारला जातोय. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif On Rohit Sharma) यांनीही याच मुद्द्यावरून थेट BCCI वर निशाणा साधला आहे. रोहितने देशासाठी सोळा वर्षे दिली, मात्र आपण त्याला एक वर्षही देऊ शकलो नाही अशी खंत मोहम्मद कैफने बोलून दाखवली. याबाबतचा व्हिडिओ त्याने ट्विटर वर ट्विट केला आहे.
काय म्हणाला मोहम्मद कैफ? Mohammad Kaif On Rohit Sharma
मोहम्मद कैफने रात्री १२:०० वाजता एक्स वर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने म्हटलं, रोहित शर्माने भारताला १६ वर्षे दिली, पण आम्ही त्याला एकही वर्ष देऊ शकलो नाही. कर्णधार म्हणून, त्याने खेळलेल्या १६ आयसीसी टूर्नामेंट सामन्यांपैकी १५ सामने जिंकले आहेत आणि फक्त एक सामना गमावला आहे, तो सुद्धा २०२३ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना….. २०२५ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी हा त्याचा शेवटचा सामना होता, जिथे त्यांनी मॅच विनिंग खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
2024 चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने मनाचा मोठेपणा दाखवत t20 मधून निवृत्ती जाहीर केली. नवीन खेळाडूंना संधी मिळावी हाच त्या मागचा हेतू होता. यानंतर काही दिवस रोहित शर्मा प्रकाशझोतापासून दूर राहिला, आणि नंतर काही खेळाडू आले आणि त्याचे कर्णधारपद गेले. भारतात असे एक उदाहरण आहे की तुम्ही तुमचा कालावधी जोपर्यंत टिकतो तोपर्यंत वाढवावा, परंतु रोहितने तसे केले नाही. त्याने अनेक खेळाडूंना सर्वकाही शिकवले, परंतु आम्ही त्याला एका वर्षासाठी, २०२७ च्या विश्वचषकासाठी कर्णधारपदी ठेऊ शकलो नाही. आम्ही त्याला एक वर्षही देऊ शकलो नाही. Mohammad Kaif On Rohit Sharma
सध्याचा काळ रोहितचाच होता
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “8 महिन्यांत आम्हाला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा ची जागा आता शुभमन गिल घेईल. गिल तरुण आणि नवीन आहे आणि तो एक चांगला कर्णधार होऊ शकतो, पण प्रत्येक गोष्टीत घाई का करावी? भविष्यात शुभमची वेळ नक्कीच आली असती परंतु सध्याचा काळ हा रोहित शर्माचाच होता… असं मोहम्मद कैपने ठासून सांगितलं आणि आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.





