Marathi News

T20 मुंबई लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सचा सोबो मुंबई फाल्कन्सवर ५ विकेट्सनी दणदणीत विजय, रॉयल्सने विजेतेपदावर कोरले नाव

Written by:Astha Sutar
Last Updated:
साहिल जाधव (२२), सचिन यादव (१९) आणि स्फोटक अवैस खान (३८) यांनी मोलाचे योगदान दिले. यामुळे मराठा रॉयल्सने 157 धावांचे माफक आव्हान पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत. t20 मुंबई लीग 2025 या विजेतेपदावर नाव कोरले.
T20 मुंबई लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सचा सोबो मुंबई फाल्कन्सवर ५ विकेट्सनी दणदणीत विजय, रॉयल्सने विजेतेपदावर कोरले नाव

T-20 Mumbai League 2025 : T20 मुंबई लीग स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने  मुंबई सोबो मुंबई फाल्कन्सवर दमदार विजय मिळवला. या सामन्यात मुंबईत सेंटर मराठा रॉयल्सने सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील सोबो मुंबई फाल्कन्सचा पाच विकेट्सने पराभव करून टी-२० मुंबई लीग २०२५ विजेतेपदावर मोहर उमटवली. मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने १५७ धावांचे लक्ष्य सहज पार केले.

मराठा रॉयल्सचा दमदार विजय…

दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील सोबो मुंबई फाल्कन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या. हे आव्हान घेऊन उतरलेला मराठा रॉयल्सला सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली नाही. कर्णधार सिद्धेश लाड (१५) आणि साहिलने ३२ धावांची जलद सलामी भागीदारी करून रॉयल्सला स्थिर सुरुवात करून दिली. त्यानंतर चिन्मयने जबाबदारी स्वीकारली आणि सचिन यादवसोबत ४१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अवैस खानसोबत ६३ धावांची भागीदारी केली. चिन्मय सुतार (५३) ने एमएससी मराठा रॉयल्सचा पाठलाग यशस्वीपणे पूर्ण केला.

फाल्कन्सचे १५७ धावांचे आव्हान…

प्रथम फलंदाजी करताना श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळणा-रा सोबो मुंबई फाल्कन्सने मयुरेश तांडेल (नाबाद ५०) च्या संयमी अर्धशतकाच्या आणि हर्ष आघावच्या दमदार नाबाद ४५ धावांच्या जोरावर ४/१५७ धावा केल्या. सुरवातीला अतिशय संथ गतीने धावा काढल्या. श्रेयस अय्यरला अपेक्षित खेळ साकारती आली नाही. प्रथम फलंदाजी करताना केवळ १५७ धावांचे माफक आव्हान दिले. श्रेयश अय्यर मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींना होती. परंतु श्रेयस अय्यरला मोठी खेळी साकारता आली नाही.

या अंतिम सामन्यात भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेता संघाचे कर्णधार कपिल देव आणि महान क्रिकेटपटू दिलीप वेगसरकर तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हे वानखेडेवर उपस्थित होते.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews