भारतीय क्रिकेट विश्वात आज खळबळ उडवून देणारा निर्णय झाला. निवड समितीने रोहित शर्माचे (Rohit Sharma) वनडे कर्णधारपद काढून ते शुभमन गिलच्या गळ्यात टाकले. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड समितीने संघ जाहीर करताना शुभमन गिलला एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा नवा कर्णधार म्हणून जाहीर केलं. ज्या रोहित शर्माने भारताला t20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली त्याच रोहित शर्माचे कर्णधारपद असे अचानक का काढलं? यावरून अनेक चर्चा रंगू लागल्या. BCCI ने इतका कठोर निर्णय का आणि कशासाठी घेतला?? यावरून अनेकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली. मात्र आता खुद्द निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी याबाबतचे कारण स्पष्ट केलं आहे.
रोहितचे कर्णधारपद का काढलं? Rohit Sharma
पत्रकार परिषद बोलताना अजित आगरकर म्हणाले, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय आमच्यासाठी सोप्पा नव्हता. रोहितने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसती, तरीही त्याचे (Rohit Sharma) कर्णधारपद काढणे एक कठीण निर्णय ठरला असता. परंतु आम्हाला भविष्याचा विचार करावा लागतो. भारतीय संघ सध्या संघ कोणच्या स्थितीत आहे आणि संघाला काय हवे आहे ते पहावे लागते. 2027 च्या विश्वचषकापूर्वी आम्हाला कर्णधार बदलायचा होता, आमच्या सर्वांचा तोच दृष्टिकोन होता. त्यामुळे रोहित शर्माचे कर्णधारपद काढून ते शुभमन गिलकडे सोपवण्यात आल्याचे अजित आगरकर यांनी सांगितले.
हे ही वाचा
गिलला वेळ देणे आवश्यक आहे
अजित आगरकर पुढे म्हणाले की, शुभमन गिलला एकदिवसीय क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून स्वतःला विकसित करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. एखाद्या वेळी, तुम्हाला पुढील विश्वचषकाचा विचार करावा लागतो आणि हा फॉरमॅट आता फार क्वचितच खेळला जातो. त्यामुळे, पुढच्या कर्णधाराला देण्यासाठी फारसे सामने नाहीत. त्याला तयारी आणि रणनीती आखण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. जेणेकरून तो २०२७ साठी तयारी करू शकेल असे अजित आगरकर यांनी स्पष्ट केले.