T20 Mumbai League : आज श्रेयस अय्यरची मुंबई फाल्कन्स विरुद्ध सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात अंतिम सामना रंगणार, मॅच कुठे दिसणार?

Written by:Astha Sutar
Last Updated:
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील सोबो मुंबई फाल्कन्सने बांद्रा ब्लास्टर्सशी ५ विकेटनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर मराठा रॉयल्सने कर्णधार सिद्धेश लाड व गोलंदाज रोहन राजेंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळ या दोन संघातील कोणता संघ बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
T20 Mumbai League : आज श्रेयस अय्यरची मुंबई फाल्कन्स विरुद्ध सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात अंतिम सामना रंगणार, मॅच कुठे दिसणार?

T20 Mumbai League – आज वानखेडे स्टेडियमवर टी२० मुंबई लीग स्पर्धेतील श्रेयस अय्यरचा मुंबई फाल्कन्सने विरुद्ध सिद्धेश लाडचा सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. टी२० मुंबई लीग क्रिकेट स्पर्धा मुंबईच्या खेळाडूंसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. ४ जूनपासून ही स्पर्धा सुरु झाली आहे. मंगळवारी झालेल्या चार संघातील सामन्यामधून श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबई फाल्कन्सने आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने विजय मिळवत थेट अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळं आज (गुरुवारी) श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सोबो मुंबई फाल्कन्स विरुद्ध मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात लढत होणार असून,  या दोन संघातून कोण बाजी मारतो?, याकडे तसेच श्रेयस अय्यरच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तिस-या T20 मुंबई लीगवर नाव कोण कोरणार?

मंगळवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्ट्रायकर्सने धावांचे माफक आव्हान दिले होते. डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य धुमलच्या मदतीने राजेने आघाडीच्या आणि मधल्या फळीला धक्का दिला आणि १० षटकांत त्यांची धावसंख्या ४ बाद ५७ अशी केली. १३२ धावांचा पाठलाग करताना रॉयल्सने सावध सुरुवात केली. या धावांचा सहज पाठला रॉयल्सने केले. तर श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबई फाल्कन्सने वांद्रे ब्लास्टर्सवर पाच विकेट्सने विजय मिळवत टी२० मुंबई लीग २०२५ च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. त्यामुळं हो दोन तगडे संघ आज ऐकमेकांसमोर भिडणार आहेत. यातून कोण जिकतेय हे पाहणे महत्वाचे आहे. तिसरी ट्राफी कोण जिंकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सामना कुठे दिसणार?

आजचा दोन संघातील अंतिम सामना हा वानखेडे स्टेडीयमवर होणार आहे. सांयकाळी साडे सात वाजता सामना होणार आहे. हा सामना टिव्हीवर तुम्हाला स्टार स्पोर्टस २ आणि जिव्हो हॉट स्टार येथे सामना दिसणार आहे. तर दुसरीकडे सामन्यावर पावसाचे देखील सावट आहे. कारण या स्पर्धेतील एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळं आज पावसाची शक्यता कमी असली आहे. पण पाऊस पडल्यास हा सामना वीस षटकाऐवजी पाच किंवा दहा षटकाचा होऊ शकतो.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews