T20 World Cup 2026 Schedule : T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; रोहित शर्मा ब्रँड अॅम्बेसेडर

Published:
यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद हे भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे बजावणार असून एकूण 20 संघ भाग घेणार आहेत.संपूर्ण स्पर्धा एकूण आठ ठिकाणी खेळवली जाईल
T20 World Cup 2026 Schedule : T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; रोहित शर्मा ब्रँड अॅम्बेसेडर

T20 World Cup 2026 Schedule : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ७ फेब्रुवारी पासून क्रिकेटच्या या रणांगणाला सुरुवात होणार असून अंतिम सामना ८ मार्च रोजी होणार आहे. टीम इंडियाच्या गटात नेदरलँड्स, पाकिस्तान, नामिबिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे. सर्वांचं लक्ष लागलेले भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 15 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत.

एकूण 20 संघ भाग घेणार

यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद हे भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे बजावणार असून एकूण 20 संघ भाग घेणार आहेत.संपूर्ण स्पर्धा एकूण आठ ठिकाणी खेळवली जाईल, त्यापैकी पाच भारतात असतील, तर तीन श्रीलंकेत असतील.मुंबईसह, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता आणि अहमदाबाद येथे  विश्वचषकाचे सामने होतील. भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

टीम इंडियाचे वेळापत्रक कसे आहे? T20 World Cup 2026 Schedule

भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध वर्ल्डकप मधील पहिला सामना खेळेल. यानंतर, टीम इंडिया १२ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत नामिबियाशी सामना करेल. १५ फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक मुकाबला बघायला मिळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना श्रीलंकेतील आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्ताननंतर, टीम इंडिया त्यांच्या शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात अहमदाबादमध्ये नेदरलँड्सशी सामना करेल. T20 World Cup 2026 Schedule

स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाईल. परंतु, अंतिम सामन्याचे ठिकाण पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचतो की नाही यावर अवलंबून असेल. जर पाकिस्तानचा संघअंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला तर तो सामना कोलंबोमध्ये खेळवला जाईल. जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला तर शीर्षक सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews