T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची T20 वर्ल्डकपसाठी T20 वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संयुक्तपणे संघाची घोषणा केली. संघात अनुभव आणि नव्या दमाच्या खेळाडूंचा समन्वय साधण्यात आला आहे. वर्ल्ड कप पूर्वी जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही हा संघ खेळेल.
गिलला वगळले –
टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात सलामीवीर शुभमन गिलला वगळण्यात आलं आहे. त्याच्या ऐवजी सलामीवीर म्हणून अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन असे पर्याय आहेत. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, रिंकू सिंग असेल. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे अखेरच्या षटकात बॉलर्सवर तुटून पडतील. या संघात ३ फिरकीपटू आणि ३ जलदगती गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून अंतिम सामना 20 मार्च रोजी होणार आहे. मागील वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला लोळवून विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली इतिहासाची पुनरावृत्ती होते का ते बघावं लागेल. T20 World Cup 2026
कसा आहे संघ – T20 World Cup 2026
फलंदाज – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
यष्टीरक्षक – इशान किशन, संजू सॅमसन.
अष्टपैलू खेळाडू – अक्षर पटेल (उपकर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे.
फिरकीपटू – वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
वेगवान गोलंदाज – जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाचे सामने
7 फेब्रुवारी 2026: भारत vs युएसए, मुंबई
12 फेब्रुवारी 2026: भारत vs नामीबिया, दिल्ली
15 फेब्रुवारी 2026: भारत vs पाकिस्तान, प्रेमदासा, कोलंबो
18 फेब्रुवारी 2026: भारत vs नेदरलँड्स,अहमदाबाद





