ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या ट्राफीचे दिग्गजांच्या उपस्थितीत अनावरण, भारताचे सामने कुठे व कधी होणार?

Written by:Astha Sutar
Published:
आजपासून आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपचे कांऊटडाऊन सुरु झाले असून, आजपासून केवळ 50 दिवस बाकी आहेत. तर ही स्पर्धा भारतातील एकूण पाच शहरात क्रिकेटचे सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.
ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या ट्राफीचे दिग्गजांच्या उपस्थितीत अनावरण, भारताचे सामने कुठे व कधी होणार?

ICC Women Cricket World Cup – आज आयसीसी वुमन वर्ल्ड कप 2025 या स्पर्धेची माहिती देण्यासाठी मुंबईत भव्य दिव्य कार्यक्रम आयोजन करण्यात आले. पुरुषांच्या संघाप्रमाणे महिलाही काही मागे नाहीत. भारतीय महिला क्रिकेट संघ देखील दमदार कामगिरी करत आहे. दरम्यान, भारत आणि श्रीलंका या दोन देशात आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 ही स्पर्धा होणार आहे. 30 सप्टेंबरला ही स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेकड क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.

दिमाखात ट्राफीचे अनावरण…

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेत सामने होणार आहेत. या महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या ट्राफीचे दिग्जांच्या उपस्थितीत मुंबईत अनावरण करण्यात आले. यावेळी भारतीय संघाची माजी कर्णधार मिथाली राज, भारताचा माजी क्रिकेटपट्टू युवराज सिंग, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, फलंदाज स्मृती मंधाना, प्रसिद्ध खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज तसेच ICC चे अध्यक्ष जय शाह आदी उपस्थित होते. भारतात क्रिकेट वर्ल्ड कप होत असल्यामुळे, खूप आनंद होत आहे. मी खूप उत्साही आहे. नक्कीच आपली टीम चांगली कामगिरी करेल, असा विश्वास माजी कर्णधार मिथली राज हिने व्यक्त केला.

भारत चांगली कामगिरी करेल…

जेव्हा क्रिकेट वर्ल्डकप असतो, तेव्हा टिव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रही क्रिकेटमुळं जास्त वाचली जातात. सोशल मीडियावर क्रिकेटबद्दल बोलले जाते. असं युवराज सिंग म्हणाला. तर भारतात क्रिकेटला धर्म मानला जातो. देशात वर्ल्डकप होत असल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट टीमकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आणि नक्कीच भारतीय टीम चांगली कामगिरी करेल, अनेक वर्षानंतर भारतात क्रिकेट वर्ल्ड कप होत आहे. त्यामुळे मी खूप एक्साटिंग व उत्साही आहे, असं माजी क्रिकेटपट्टू युवराज सिंग म्हणाला.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews