सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांच्यात झाला क्रिकेट सामना, जाणून घ्या दिग्गजांची ही ‘लढत’ कोणी जिंकली?

Published:
सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांची ही भेट ISPL सिझन 3 दरम्यान सुरतमध्ये झाली. सचिन तेंडुलकर येथे कोर कमिटीचे सदस्य असल्यामुळे उपस्थित होते.
सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांच्यात झाला क्रिकेट सामना, जाणून घ्या दिग्गजांची ही ‘लढत’ कोणी जिंकली?

क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज, सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसले. यावेळी ना बॅटची गरज होती, ना मैदानाची. कोणतेही साधन नसतानाही त्यांनी हातांनीच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. दोघेही या व्हिडिओमध्ये मनमुराद मस्ती करताना दिसत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सचिनसोबतच्या या संस्मरणीय आणि मजेदार क्षणाचा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांनी स्वतः शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, “क्रिकेटच्या देवासोबत बोटांनी क्रिकेट खेळणे.”

अमिताभ बच्चन हे माझी मुंबई फ्रँचायझीचे मालक

सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांची ही भेट ISPL सिझन 3 दरम्यान सुरतमध्ये झाली. सचिन तेंडुलकर येथे कोर कमिटीचे सदस्य असल्यामुळे उपस्थित होते. तर दुसरीकडे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन हे माझी मुंबई फ्रँचायझीचे मालक आहेत. सुरुवातीला दोघेही आपसात चर्चा करत होते, पण काही वेळातच त्यांनी फिंगर क्रिकेट खेळत वातावरण अधिकच आनंदी आणि खेळीमेळीचे केले.

तेंडुलकर विरुद्ध बच्चन, कोण जिंकलं?

या फिंगर क्रिकेटच्या सामन्यात कुणीही जिंकलं नाही. तेंडुलकर विरुद्ध बच्चन हा सामना बरोबरीत (टाय) राहिला. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गंमतीशीर अंदाजात ट्रॉफी अर्धी-अर्धी वाटून घेऊया, असं म्हटलं. चाहत्यांनीही कमेंट सेक्शनमध्ये दोघांवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. अनेक चाहत्यांनी सांगितलं की सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांच्या या व्हिडिओने त्यांना त्यांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या करून दिल्या.