भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान छान गोड पदार्थ बनवून द्या. आज आम्ही तुम्हाला ड्रायफ्रुट्स बर्फी कशी बनवायची ह्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…
साहित्य
- १ लिटर दूध
- १/४ कप खवा
- १/२ कप साखर
- २ चमचे तुपाचा वापर
- चिरलेला सुका मेवा (बदाम, काजू, अक्रोड, अंजीर)
- केशर (दुधात भिजवलेले)
कृती
- एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा आणि त्याला घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
- दुधाला घट्टपणा आल्यावर त्यात खवा आणि साखर घाला.
- मिश्रण व्यवस्थित एकत्र झाल्यावर त्यात चिरलेला सुका मेवा आणि केशर घाला.
- मिश्रण एका तूप लावलेल्या ताटलीत पसरवा आणि थंड होऊ द्या.
- थंड झाल्यावर बर्फीच्या आकारात कापून घ्या आणि दिवाळीत पाहुण्यांना सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..