दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळी म्हंटली की फराळ हा आलाच; घरात करंजी, शंकरपाळी, लाडू, चिवडा यांसारखे गोड-तिखट पदार्थ बनवले जातात, दिवाळीत सतत गोड, गोड खाऊन कंटाळा आला की काहीतरी चटपटीत खावंस वाटतं. अशावेळी तुम्ही नमकीन मठरी खाऊन फराळाचा आनंद घेऊ शकता…
साहित्य
मैदा
रवा
तूप
कसुरी मेथी
ओवा
काळी मिरी पावडर
मीठ
पाणी
तेल
कृती
- एका भांड्यात मैदा, रवा आणि तूप घालून चांगले मिसळून घ्यावे लागेल. त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, कसुरी मेथी आणि ओवा घालून मिक्स करा. मठरी कुरकुरीत करण्यासाठी त्यात तुपाचे मोहन घाला.
- पीठ व्यवस्थित मिक्स करुन त्यात मळण्यासाठी थोडे थोडे पाणी घालून कणिक तयार करा.
- पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या आणि १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा.
- नंतर पिठाचे छोटे गोळे करुन लहान पुऱ्या बनवा.
- पुऱ्यांना काटे चमच्याने टोचे मारा जेणेकरून ती तळताना फुगणार नाही.
- एका कढईत तेल गरम करून घ्या आणि मंद आचेवर पुऱ्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढा आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरा.
टिप्स
- मठरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ घट्ट मळावे.
- तळताना गॅसची आच मंद ठेवावी, जेणेकरून मठरी आतून कच्ची राहणार नाही.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..