प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. यंदाच्या दिवाळीच्या फराळाची तयारी घरोघरी सुरु झाली असेल. दिवाळीचा फराळामध्ये रव्याचा लाडू हा असतो. चला तर मग जाणून घेऊ या रव्याच्या लाडूची रेसिपी….
साहित्य
- जाड रवा: १ कप
- साखर: १/२ कप (किंवा तुमच्या चवीनुसार)
- तूप: पाव कप
- वेलची पावडर: १/२ चमचा
- ड्राय फ्रुट्स: तुमच्या आवडीनुसार (काजू, बदाम, मनुका)
कृती
- एका कढईत तूप गरम करा आणि त्यात रवा घालून मंद आचेवर खमंग सोनेरी होईपर्यंत भाजा. सुमारे २० मिनिटे लागू शकतात.
- रवा भाजून झाल्यावर त्यात ड्राय फ्रुट्स आणि वेलची पावडर घालून चांगले मिसळा.
- गॅस बंद करा. तयार मिश्रणामध्ये पिठीसाखर घाला आणि चांगले एकत्र करा.
- मिश्रण कोमट असतानाच त्याचे छोटे-छोटे लाडू वळा.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..