दिवाळीच्या धामधूमीला सुरूवात झाली. दिवाळीत लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे अशा अनेक पदार्थाची मेजवाणीच असते. परंतु, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कमी वेळेत कोणता गोडाचा पदार्थ देवीच्या नैवेद्याला बनवावा असा प्रश्न पडतो. अशा वेळी कमी वेळेत आणि पटकन बनणारा स्पेशल साजूक तुपातील शेवयांच्या खीरीचा बेत आखावा. चला तर मग पाहूयात ही रेसीपी कशी बनवायची….
साहित्य
- दूध
-
शेवया - साखर
- तूप
- सुका मेवा काजू, बदाम, मनुका, चारोळी
कृती
- एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा.
- त्यात शेवया घालून सोनेरी रंगावर भाजून घ्या.
- आता त्यात दूध घाला आणि शेवया मऊ होईपर्यंत शिजवा.
- शेवया शिजल्यानंतर त्यात साखर आणि ड्रायफ्रुट्स घाला.
- साखर विरघळेपर्यंत आणि खीर घट्ट होईपर्यंत शिजवा.
- गरम किंवा थंड खीर नैवेद्यासाठी तयार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..