घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटी खूप प्रभावी मानली जाते. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की तुरटी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवते. जर तुम्हालाही तुमच्या घरात काही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर तुरटीचे उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. तुरटीचे सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेऊयात..
नकारात्मक ऊर्जा
घरातल्या काचेच्या भांड्यात तुरटीचे तुकडे ठेवून ते घराच्या कोपऱ्यात ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. तसेच दारे-खिडक्यांजवळ आणि बाथरूममध्येही तुरटी ठेवल्याने सकारात्मकता येते, असे वास्तुशास्त्र सांगते, ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुख-समृद्धी नांदते.
वाईट नजर
लहान मुलांवर वाईट नजर पडू नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा खडा टाकावा किंवा त्यांच्याजवळ ठेवावा, यामुळे वाईट नजर लागत नाही, अशी श्रद्धा आहे. मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा घरात वाईट नजर पडेल अशा ठिकाणी तुरटीचा तुकडा बांधा.
आर्थिक समस्या
तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी तुरटीचा एक छोटा खडा ठेवल्याने धन टिकून राहते आणि आर्थिक स्थिती सुधारते. यामुळे लक्ष्मीची कृपा होते आणि पैशांची चणचण दूर होते, असे म्हटले जाते. तुमच्या कामात यश मिळत नसेल, तर एका काचेच्या भांड्यात तुरटी आणि थोडे मीठ घेऊन ते घरात ठेवा, जेणेकरून धनलाभ होईल.
स्वच्छता
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुरटीचा खडा ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्ती प्रवेश करत नाहीत, असेही सांगितले जाते.
नियमित बदल
हे उपाय करताना दर शनिवारी तुरटी बदलणे अधिक शुभ मानले जाते, कारण तुरटी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि वेळोवेळी ती बदलणे आवश्यक असते.
घरात तुरटी कुठे ठेवावी?
- घरातील प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात काचेच्या प्लेटमध्ये तुरटीचे तुकडे ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
- मुख्य खिडक्या आणि दारांजवळ तुरटीचे छोटे तुकडे ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते.
- बाथरूममध्ये एक वाटी तुरटी ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मकता शोषली जाते.
- आर्थिक समृद्धीसाठी रोख रकमेच्या ड्रॉवरमध्ये किंवा तिजोरीत तुरटीचा तुकडा ठेवू शकता, असे मानले जाते.
- नकारात्मक ऊर्जा घरात येण्यापासून रोखण्यासाठी काळ्या कापडात बांधलेली तुरटी मुख्य दरवाजावर लटकवा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





