Which foods to avoid if you have a urinary tract infection: आजकाल यूटीआय म्हणजेच लघवीच्या संसर्गाची समस्या सामान्य झाली आहे. पाचपैकी एका महिलेला त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी युरीन इन्फेक्शनचा त्रास होतो. यापैकी वीस टक्के महिलांना हा आजार एकापेक्षा जास्त वेळा होतो. मूत्रमार्गात वेदना,लघवी करताना वेदना आणि वारंवार लघवी होणे ही यूटीआयची लक्षणे आहेत.
मूत्रमार्गात बॅक्टेरिया प्रवेश करतात तेव्हा मूत्रमार्गात संसर्ग होतो. ज्यामुळे मूत्रमार्गात जळजळ होते. त्यामुळे खालच्या ओटीपोटात वेदना आणि गोळेदेखील येऊ शकतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी काही पदार्थ खाणे टाळावेत. या पदार्थांबाबत जाणून घेऊया….
जास्त मसाल्याचा आहार-
आपल्यापैकी बहुतेकांना मसालेदार जेवण आवडते. परंतु, जर तुम्हाला यूटीआय असेल तर मसालेदार पदार्थ टाळा. असे पदार्थ खाल्ल्याने यूटीआयची लक्षणे वाढू शकतात. म्हणून, या स्थितीत कमी मसालेदार पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.
सोडा असलेले ड्रिंक्स-
सोडा सेवन केल्याने मूत्रमार्गाचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे तुमच्या मूत्राशयाला त्रास होऊ शकतो. म्हणून, जर तुम्हाला यूटीआय असेल तर सोडा असलेले ड्रिंक्स टाळा.
चहा आणि कॉफी –
जवळपास सर्वांनाच चहा कॉफी प्यायला आवडते. पण तुम्हाला यूटीआयचा त्रास होत असेल, तर ते तुमच्या समस्येला वाढवू शकते. कॅफिनचे प्रमाण तुमच्या मूत्राशयाला त्रास देऊ शकते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणे वाढवू शकते. अशा परिस्थितीत, चहा किंवा कॉफी टाळणे हा तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
आंबट फळे –
आंबट फळे यूटीआयची लक्षणे वाढवू शकतात. फळे खूप आरोग्यदायी मानली जातात, परंतु सायट्रिक आम्ल असलेली फळे यूटीआयसाठी फायदेशीर नाहीत. आंबट फळे खाल्ल्याने मूत्रमार्गात जळजळ जास्तच वाढू शकते. म्हणून, यूटीआयवर उपचार घेत असताना लिंबू, संत्री, द्राक्षे आणि टोमॅटो यांसारखी फळे टाळा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





