Sun, Dec 28, 2025

रोजच्या आहारातील ‘या’ पदार्थांमुळे होऊ शकतो मुतखडा, जास्त सेवन करणे टाळा

Published:
शरीरातील इतर बदलांसोबतच काही पदार्थांमुळेदेखील किडनी स्टोन होऊ शकतो.
रोजच्या आहारातील ‘या’ पदार्थांमुळे होऊ शकतो मुतखडा, जास्त सेवन करणे टाळा

What foods cause kidney stones:   बदलेल्या जीवनशैलीमुळे आजकाल लोकांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकी किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा हे खूप सामान्य झाले आहे. किडनी स्टोन तयार होण्याची अनेक कारणे आहेत. ही समस्या केवळ वृद्धांनाच नाही तर सर्व वयोगटातील लोकांना देखील होते. शरीरातील खनिजे आणि इतर घटकांचे असंतुलन झाल्यास किडनी स्टोन तयार होतात.

परंतु काही पदार्थांमुळेदेखील किडनी स्टोन होऊ शकतो. आज आपण असे काही पदार्थ जाणून घेणार आहोत, ज्यांच्या जास्त सेवनाने किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. चला जाणून घेऊया हे पदार्थ नेमके कोणते आहेत……

जंकफूड-
तळलेले आणि जंक फूडचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. म्हणून, जर तुम्हाला किडनी स्टोनचा धोका टाळायचा असेल तर हे पदार्थ टाळा.

जास्त मीठ असलेले पदार्थ-
अतिरिक्त सोडियमचे सेवन हे किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरू शकते. खरं तर, जास्त मीठ असलेलाआहार शरीरात कॅल्शियमची पातळी वाढवू शकतो. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

मसाले आणि मिरच्या-
मिरच्या आणि मसाल्यांचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो. खरं तर, असे पदार्थ शरीरात पित्त वाढवतात. जे किडनी स्टोनचे एक प्रमुख कारण असू शकते. म्हणून, हे पदार्थ खाणे टाळा.

आंबट पदार्थ –
आंबट पदार्थांमुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. यामध्ये टोमॅटो, लिंबाचा रस, चिंच, लोणचे इत्यादींचा समावेश आहे. हे पदार्थ आपल्या शरीरात आम्लता वाढवतात. ते कॅल्शियम ऑक्सलेटच्या निर्मितीला देखील प्रोत्साहन देतात. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

साखर आणि गोड पदार्थ –
अति साखर आणि गोड पदार्थांच्या सेवनामुळे किडनी स्टोन होऊ शकतात. या पदार्थांचे सेवन केल्याने कॅल्शियम आणि ऑक्सलेटचे संतुलन बिघडू शकते. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. म्हणून, तुमच्या आहारात नैसर्गिक गोड पदार्थांचा समावेश करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)