Tue, Dec 30, 2025

तुमच्या ‘या’ ५ सवयींमुळे कमी होत नाहीत पिंपल्स, आजच बदला

Published:
तज्ज्ञांच्या मते पिंपल्स दूर करण्यासाठी फक्त औषधेच नव्हे तर जीवनशैलीतील काही बदल आवश्यक आहेत.
तुमच्या ‘या’ ५ सवयींमुळे कमी होत नाहीत पिंपल्स, आजच बदला

Tips to get rid of pimples:   आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयी, जीवनशैलीतील बदल आणि मेकअपच्या चुकांमुळे पिंपल्स येणे सामान्य आहे. पिंपल्स हे फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच खराब करत नाहीत तर, खूप वेदनादायक देखील असतात. अनेकदा असे दिसून येते की लोक त्यापासून आराम मिळवण्यासाठी फेस वॉश, क्लींजर आणि क्रीम सारख्या महागड्या ब्युटी प्रॉड्क्टसचा वापर करतात. परंतु, या प्रॉड्क्टसमधील केमिकल्स पिंपल्सची समस्या आणखी वाढवतात.

तर दुसरीकडे तुमच्या काही दैनंदिन सवयींमुळेदेखील चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीत. तुमच्या या सवयी पिंपल्स आणखी वाढवतात. आज आपण या सवयींबाबत जाणून घेऊया….

उपचारासाठी पुरेसा वेळ न देणे-
बऱ्याचदा लोक पिंपल्सवर उपचार करण्यासाठी घाई करतात. आणि जेव्हा त्यांना लवकर फरक दिसत नाहीत तेव्हा ते उपचार सोडून देतात. परंतु तज्ज्ञांच्या मते, पिंपल्सवर उपचार करण्यासाठी किमान सहा आठवडे लागतात. जर तुम्ही देखील पिंपल्सवर उपचार घेत असाल तर सहा आठवडे उपचार सुरू ठेवा. तोपर्यंत संयम ठेऊन राहा.

चुकीचा आहार –
बहुतेक चेहऱ्याच्या समस्या आतड्यांमधून उद्भवतात. अनहेल्दी प्रक्रिया केलेले, जंक फूड, साखर आणि दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन केल्याने पिंपल्स होऊ शकतात. हे टाळण्यासाठी, तुमच्या आहारात साखर आणि दुग्धजन्य पदार्थ टाळा. योग्य आहाराचे पालन करून पिंपल्स टाळता येतात.

चुकीचा क्लिन्जर निवडणे-
तुम्हालाही ही गोष्ट नवल वाटेल परंतु चुकीचे क्लिन्जर वापरल्यानेदेखील पिंपल्स होऊ शकतात. डॉक्टर असा क्लिन्जर वापरण्याचा सल्ला देतात जो त्वचा कोरडी न करता छिद्रांमधील घाण काढून टाकतो. बहुतेक लोक पिंपल्स कमी करण्यासाठी हार्श क्लिन्जर वापरतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

उशांचे कव्हर न बदलणे –
महिनोनमहिने उशांचे कव्हर न बदलल्यानेही पिंपल्स होऊ शकतात. उशांमुळे पिंपल्स होऊ नयेत म्हणून, दर २ ते ३ दिवसांनी तुमच्या उशांचे कव्हर बदला. शक्य असेल तेव्हा रेशमी मटेरियलपासून बनवलेले उशांचे कव्हर वापरा.

टाळूची स्वच्छता न करणे-
पिंपल्स कमी करण्यासाठी लोक अनेकदा नियमितपणे त्यांचा चेहरा स्वच्छ करतात. हे आवश्यक आहे. पण पिंपल्स कमी करण्यासाठी नियमित टाळूची साफसफाई देखील आवश्यक आहे. तज्ज्ञ म्हणतात की, टाळूमध्ये तेलाचे उत्पादन जलद होते. हे तेल कपाळावर आणि गालावर पोहोचते, ज्यामुळे पिंपल्स होतात. पिंपल्स कमी करण्यासाठी नियमित टाळूची साफसफाई करणे आवश्यक आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)