हळदीचे पाणी चमत्कारिक मानले जाते. हळदीच्या पाण्याचे उपाय केल्यानं घरातील विविध समस्या आणि प्रत्येक दुःख नाहीसं होतं, असं मानलं जातं. घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. याबद्दल जाणून घेऊयात..
सकारात्मक ऊर्जा
हळद पवित्र असल्याने मुख्य दरवाजावर पाणी शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्ती घरात प्रवेश करतात. घरातली वाईट ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते, ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते. मुख्य दरवाजाला वास्तुचा केंद्रबिंदू मानले जाते, त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष कमी होतात.
वास्तुदोष कमी होतात
मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात आणि राहूचा प्रभाव कमी होतो. उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरातील वास्तु आणि ग्रह दोष दूर होतात. उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं राहुचे दुष्परिणाम घरावर होत नाहीत .
आर्थिक लाभ
सकाळी दारात हळद पाणी शिंपडणे हे वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा आणते, नकारात्मक शक्ती दूर करते आणि आर्थिक समृद्धी, सुख-शांती आणण्यास मदत करते. धन आणि समृद्धी आकर्षित होते, पैशांची समस्या कमी होते.
आजारापासून मुक्तता
हळदीमध्ये असलेले घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, सर्दी-खोकला दूर ठेवतात. पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे विकार कमी होतात. त्वचेला नैसर्गिक चमक येते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





