रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षामधील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. तसेच सूर्याला पाणी अर्पण करून दान देखील केले जाते. रथसप्तमी कधी आहे, पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घ्या…
कधी आहे रथसप्तमी ?
रक्षसप्तमी रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजून 39 मिनिटांनी सुरु होईल आणि 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार 25 जानेवारीला रथसप्तमी साजरी केली जाईल. यावर्षी रथ सप्तमीला स्नान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी 7 वाजून13 मिनिटांपर्यंत असेल.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..
रथसप्तमीची पूजा कशी करायची
- सूर्योदयापूर्वी, शक्यतो अरुणोदयाच्या वेळी, पवित्र स्नान करावे.
- सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे (अर्घ्य द्यावे).
- सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि ‘ॐ सूर्याय नमः’ किंवा ‘ॐ घृणि सूर्याय नमः’ यांसारख्या मंत्रांचा जप करावा.
- लाल फुले, चंदन, कापूर आणि उदबत्ती वापरून सूर्यदेवाची पूजा करावी, तुपाचा दिवा लावावा.
- या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते.