हिंदू धर्मात, त्रिदेवांपैकी एक असलेले महादेव यांना देवादी देव म्हंटले जाते. भगवान शंकराच्या पूजेला अनन्य साधारण महत्व आहे. भगवान शिवाच्या पूजेत बेलाचे पान असणे फार महत्वाचे आहे. बेलपत्राशिवाय शिवपूजा अपूर्ण असल्याचे मानले जाते. चला जाणून घेऊया बेलपत्र अर्पण केल्यावर लगेच महादेव का प्रसन्न होतात, त्यामागे एक पौराणिक कथा आहे जी आपण जाणून घेऊया….
महादेवाला बेलपत्र का अर्पण केले जाते?
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडल्यामुळे, संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही त्रास झाला. मग सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलाहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. मग भगवान शिवाने ते हलाहल विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले. विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही आणि महादेवाचा कंठ निळा पडला.





