भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान छान गोड पदार्थ बनवून द्या. आज आम्ही तुम्हाला खव्याच्या बर्फी कशी बनवायची ह्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…
साहित्य
- २५० ग्रॅम खवा
- १ कप साखर
- १/४ कप दूध
- आवडीनुसार सुका मेवा (बदाम, पिस्ता)
कृती
- एका भांड्यात खवा घेऊन मंद आचेवर गरम करा.
- खवा पूर्णपणे विरघळल्यावर त्यात साखर आणि दूध घाला.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि भांड्याच्या कडा सोडेपर्यंत शिजवा.
- या मिश्रणात आवडीनुसार सुका मेवा घालून मिक्स करा.
- एका ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण एकसारखे पसरा.
- थंड झाल्यावर त्याच्या बर्फीच्या वड्या पाडा.
- ही बर्फी भाऊबीजेला तुमच्या भावासाठी एक उत्तम भेट ठरू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..