भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान गोड पदार्थ बनवून द्या. भाऊबीजच्या दिवशी तुम्ही लाडक्या भावासाठी केशर श्रीखंड पुरी बनवू शकता. आज आपण केशर श्रीखंड पुरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत…
साहित्य श्रीखंडासाठी
- १ किलो घट्ट दही (चक्का तयार करण्यासाठी)
- साखर (चवीनुसार)
- वेलची पूड
- केशर
- बदाम, काजू, पिस्ता (ऐच्छिक)
पुरीसाठी साहित्य
गव्हाचे पीठ
तेल (तळण्यासाठी)
मीठ (चवीनुसार).
श्रीखंड बनवण्याची कृती
-
चक्का तयार करणेएका कॉटनच्या कापडात दही बांधून ५-६ तास टांगून ठेवा. दहीतील पाणी निघून गेल्यावर ‘चक्का’ तयार होईल.
-
साखर घालणेचक्क्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली साखर घालून चांगले मिसळा.
-
केशर आणि वेलची घालणेया मिश्रणात केशर आणि वेलची पावडर घालून छान परतून घ्या.
-
सुकामेवा घालणेशेवटी चिरलेला सुकामेवा घालून चांगले मिसळून घ्या.
-
थंड करणे
तयार झालेले श्रीखंड फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..
पुरी बनवण्याची कृती
-
पीठ मळणेगव्हाच्या पिठात थोडे तेल आणि मीठ घालून मळून घ्या.
-
पुरी लाटणेपिठाचे छोटे गोळे करून पातळ पुरी लाटा.
-
तळणे
गरम तेलात पुरी सोनेरी रंगावर तळून घ्या.
टीप: तुम्ही तुमच्या आवडीनुसार श्रीखंडामध्ये पिस्ता, बदाम किंवा इतर सुकामेवा घालू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)