लवकरच दिवाळी येतेय.. त्या निमित्ताने अनेक घरात साफसफाईला सुरूवात झालीय. तर काही ठिकाणी दिवाळीचा फराळ आणि मिठाई बनवायचाही तयारी झालीय. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसा आपल्याला मिठाईचा सुगंध आणि गोडवा जाणवू लागतो. अपूप हा ऋग्वेद काळात बनवला जाणारा एक गोड पदार्थ आहे, जो तांदूळ आणि गव्हाच्या पिठात तूप किंवा दही घालून साजूक तुपात तळलेला एक प्रकारचा वडा आहे. या पदार्थाचा उल्लेख ‘यागू, पूप व भत्त’ या प्राचीन तांदळाच्या तीन प्रकारच्या पदार्थांमध्ये ‘पूप’ या नावाने आढळतो, जिथे ‘पूप’ म्हणजे वडा. अपूप’ म्हणजे असा पदार्थ जो ‘पुयते’ म्हणजेच कुजत नाही किंवा खराब होत नाही, असे म्हटले जाते.
साहित्य
- तांदळाचे पीठ
- तूप
- दही
- साजूक तूप (तळण्यासाठी)
- पिठीसाखर
कृती
- तांदळाच्या पिठात दही घालून पीठ चांगले मळून घ्यावे.
- गरज असल्यास किंचित पाणी घालावे.
- तयार पिठापासून छोट्या, जाडसर पुर्या लाटाव्यात व गरम तुपात तळाव्यात.
- तळलेले अपूप पिठीसाखरेत घोळवून गरम गरम खावेत.
टीप
- आपण आपल्या आवडीनुसार या मिश्रणात तूप किंवा दही वापरू शकता.
- अपूप हे तांदूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले एक गोड पक्वान्न आहे.
- याचा उल्लेख ऋग्वेदात ‘पूप’ या नावाने आढळतो.
- अपूपची आधुनिक आवृत्ती म्हणजे ‘मालपुवा’.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..