Tue, Dec 30, 2025

New Year 2026 : नवीन वर्षात या मुलांक्याच्या लोकांना होणार मोठा फायदा

Published:
सध्या 2025 हे वर्ष संपत आले असून सर्वजण 2026 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात कोणत्या अंकाचा व्यक्तींना आर्थिक फायदा होईल. सुखसमृद्धी आणि शांती नांदेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
New Year 2026 : नवीन वर्षात या मुलांक्याच्या लोकांना होणार मोठा फायदा

New Year 2026 : भारतात अंकशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची ही संख्या जास्त आहे. जसं जन्माच्या कुंडली वरून एखादं वर्ष सदर व्यक्तीला कसे जाईल हे बघितले जातं त्याचप्रमाणे अंकशास्त्राच्या  दृष्टिकोनातूनही त्याचा अभ्यास केला जातो. सध्या 2025 हे वर्ष संपत आले असून सर्वजण 2026 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात कोणत्या अंकाचा व्यक्तींना आर्थिक फायदा होईल. सुखसमृद्धी आणि शांती नांदेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अंक १ (१, १०, १९, २८ रोजी जन्मलेले लोक) New Year 2026

मूल्यांक १ असलेल्यांसाठी नवीन वर्ष खूप भाग्यवान ठरेल. तुमचे नेतृत्व आणि निर्णय घेण्याचे कौशल्य या वर्षी खूप फायदेशीर ठरेल. सरकारी काम, प्रशासन, व्यवस्थापन आणि व्यवसायात गुंतलेले मूलांक १ असलेले लोक या वर्षी मोठा नफा कमावतील. तसेच नवीन वर्षात कामाच्या ठिकाणी बढती आणि पगारवाढीची शक्यता देखील आहे. याशिवाय तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात.

अंक ३ (३, १२, २१, ३० रोजी जन्मलेले लोक)

मूळांक ३ असलेल्यांसाठी देखील नवीन वर्ष खूप चांगले राहील. शिक्षण, सल्लागार, मीडिया आणि प्रशिक्षणाशी संबंधित क्षेत्रात चांगला नफा मिळेल. या वर्षी तुम्हाला नवीन करार आणि क्लायंट मिळतील. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. New Year 2026

अंक ५ (५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेले लोक)

अंक ५ असलेले लोक या वर्षी खूप पैसे कमवतील. संपर्क, विक्री, विपणन आणि ऑनलाइन व्यवसायातून प्रचंड नफा मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला अचानक पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. फ्रीलान्स काम, स्टार्टअप आणि डिजिटल कामातून भरीव उत्पन्न मिळेल. तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.