Mon, Dec 29, 2025

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय!! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Published:
पीएम किसान योजनेसाठी नव्याने लाभार्थी समाविष्ट करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय!! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

PM Kisan Yojana : देशातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि शेती करत असताना त्यांना कुठेतरी थोडा आर्थिक हातभार लागावा, यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात. 2000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्यांच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांना भेटतात. आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून आता 22 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत बळीराजा आहे मात्र त्यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येते.

नव्याने लाभार्थी समाविष्ट प्रक्रिया सुरू (PM Kisan Yojana)

पीएम किसान योजनेसाठी नव्याने लाभार्थी समाविष्ट करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. शासनाच्या माहितीनुसार, तांत्रिक अडचणी,,कागदपत्रातील किंवा मालकी हक्कातील अडचणीं, आधार-बँक खात्याची लिंक नसणे, जमिनीच्या नोंदींमध्ये नावात तफावत, शेतीचा वारसा बदल, शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मालकी हस्तांतरण न होणे, अशा अनेक कारणांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळावे आणि त्यांचेही आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी सरकारने नव्याने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. PM Kisan Yojana

22 व्वा हप्ता कधी ?

दरम्यान आत्तापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 21 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असून आता बळीराजा 22 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. 21 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. पी एम किसान योजनेचे पैसे दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना मिळतात . त्यामुळे आता बाविसावा हप्ता मार्च महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते.