Tue, Dec 30, 2025

मार्केटमध्ये New Renault Duster SUV ची चर्चा; कारमध्ये नेमकं काय विशेष?

Written by:Rohit Shinde
Published:
रेनॉल्ट इंडिया नवीन जनरेशनची डस्टर एसयूव्ही पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही गाडी 16 जानेवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे.
मार्केटमध्ये New Renault Duster SUV ची चर्चा; कारमध्ये नेमकं काय विशेष?

रेनॉल्ट कंपनीच्या गाड्यांची भारतातील विश्वासार्हता हळूहळू वाढत आहे. डस्टर, क्विड आणि ट्रायबर या मॉडेल्समुळे रेनॉल्टने भारतीय बाजारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मजबूत सस्पेन्शन, चांगली ग्राउंड क्लीअरन्स आणि भारतीय रस्त्यांसाठी योग्य इंजिन ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. अशा परिस्थितीत आता कंपनीमध्ये रेनॉल्ट डस्टर नव्या रूपात लाँच केली जाणार आहे. रेनॉल्ट इंडिया नवीन जनरेशनची डस्टर एसयूव्ही पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही गाडी 16 जानेवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे.

New Renault Duster SUV ची चर्चा

रेनॉल्ट इंडिया नवीन जनरेशनची डस्टर एसयूव्ही पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही गाडी 16 जानेवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या टीझर्समध्ये तांत्रिक स्पेसिफिकेशन्सऐवजी गाडीसोबतच्या भावनिक कनेक्टवर जोर देण्यात आला आहे. यात नॉस्टॅल्जिक व्हिज्युअल आणि ‘गँग्स ऑफ डस्टर’ कम्युनिटीवर फोकस करण्यात आला आहे.

रेनॉल्ट इंडिया भारतीय बाजारपेठेत नवीन जनरेशनची डस्टर एसयूव्ही परत आणण्यासाठी सज्ज आहे. नवीन डस्टर 26 जानेवारी 2026 रोजी देशात प्रदर्शित होणार आहे. अधिकृत प्रदर्शनापूर्वी कंपनीने सोशल मीडियावर डस्टरचा एक नवीन टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये डस्टरचा भारतातील प्रवास आणि मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये पुन्हा एन्ट्री दाखवण्यात आली आहे. रेनॉल्ट इंडियाने शेअर केलेल्या नवीन टीझरमध्ये स्पेसिफिकेशन्सऐवजी लोकांबरोबरच्या प्रोडक्टच्या भावनिक कनेक्टवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

नव्या कारची वैशिष्ट्ये – अंदाजे किंमत

आगामी रेनॉल्ट डस्टर आधीच परदेशात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॉडेलप्रमाणेच असेल. भारतात स्पॉट झालेल्या टेस्ट व्हेईकलमध्ये सरळ आकार आणि स्क्वेअर-ऑफ प्रोटेक्शन दिसत आहेत. अपेक्षित एक्सटीरियर डिटेल्समध्ये वाय-शेपचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, वर्टिकल फ्रंट डिझाइन, प्रोनाउंस्ड व्हील आर्च क्लॅडिंग, रूफ रेल्स आणि मागील बाजूस कनेक्टेड एलईडी टेल-लॅम्प्सचा समावेश आहे. जागतिक स्तरावर, नवीन डस्टरची लांबी सुमारे 4,300 मि.मी. आहे आणि 2,672 मि.मी. व्हीलबेस आहे. केबिनमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले असलेले 10.1-इंच टचस्क्रीन, 7-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग आणि पॉवर्ड टेलगेट असण्याची शक्यता आहे. फोर-व्हील-ड्राईव्ह व्हेरियंटमध्ये टेरेन मॅनेजमेंट सिस्टम आणि जास्त ग्राउंड क्लीयरन्स मिळण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डस्टर Mild-Hybrid आणि Strong-Hybrid पेट्रोल पॉवरट्रेन तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. रेनॉल्टने अद्याप भारतातील इंजिन लाइनअपची माहिती दिलेली नाही. भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केल्यानंतर नवीन जनरेशनची डस्टर Hyundai Creta, Kia Seltos, मारुती सुझुकी Grand Vitara, टोयोटा अर्बन क्रूझर Hyryder आणि नवीन टाटा Sierra यांसारख्या मॉडेलशी स्पर्धा करेल. किंमत आणि व्हेरियंटची माहिती बाजारपेठेत लॉन्चच्या वेळी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी रिलीज करण्यात आलेल्या टीझरने ग्राहकांची उत्सुकता वाढवली आहे.