रक्षाबंधन म्हणजे, बहिण-भावाच्या नात्याचा सण. ज्याला राखीपौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं. संपूर्ण देशभरात हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे सर्वात सुंदर प्रतीक आहे. 2025 मध्ये म्हणजेच यंदा हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल, या सणाची नेमकी तारीख काय आणि त्याच्याशी संबंधित माहिती जाणून घेऊया…

रक्षाबंधन नेमकं कधी? 

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी श्रावणी पौर्णिमेची तिथी शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी 02 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट 2025, शनिवारी दुपारी 01 वाजून 24 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार 9 ऑगस्ट 2025, शनिवारी रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जाईल. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतील.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय? 

9 ऑगस्ट 2025 रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5:35 ते दुपारी 1:24 पर्यंत असेल. म्हणजेच, रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त जवळपास 7 तास 49 मिनिटांचा असेल. या दरम्यान तुम्ही कोणत्याही वेळी राखी बांधू शकता. या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12:00 ते 12:53 पर्यंत असेल. राखी बांधण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)