श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना व्रत-वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात तुम्हीही उपवास करत असाल तर आणि तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही हटके रेसिपी एकदा नक्की करून पहा…
साहित्य
- बटाटे – 2
- रताळी – पाव किलो
- मीठ – चवीनुसार
- तिखट – 1 चमचा
- पिठीसाखर – 1 चमचा
- राजगिरा पीठ – 1 वाटी
- तेल – अर्धी वाटी
- लिंबाचा रस – आवडीनुसार
कृती
- बटाटा-रताळ्याचे काप तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाटे आणि रताळे स्वछ पाण्याने धुवून घ्या
- यानंतर दोन्हींचे गोलाकार असे पातळ काप करून घ्या
- यानंतर एका ताटात राजगिऱ्याचे पीठ घेऊन त्यात तिखट, मीठ आणि पिठीसाखर घाला आणि मिक्स करा
- आवडीनुसार तुम्ही यात लिंबाचा रसदेखील घालू शकता
- आता बटाटा-रताळ्याचे काप यात मिसळून हा मसाला या कापांना छान लावून घ्या
- त्यानंतर दुसरीकडे गॅसवर तवा ठेवा आणि यात तेल टाका
- आता तव्यावर एक एक काप टाका आणि मंद आचेवर हे काप छान कुरकुरीत भाजून घ्या
- हे काप भाजताना गॅसची फ्लेम मंदच असूद्यात
- दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत भाजून झाल्यानंतर तुमचे काप तयार होतील.
- तयार काप प्लेटमध्ये काढून खाण्यासाठी सर्व्ह करा.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..