उपवास म्हटला की घराघरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रावणातल्या उपवासात विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, आज आम्ही अशाच एका सोप्या रेसिपी बद्दल सांगणार आहोत. श्रावण महिन्यात उपवासासाठी खास, साबुदाणा रबडीची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा! ही रेसिपी तुम्हाला उपवासाच्या दिवसात ऊर्जा देईल आणि चविष्ट देखील लागेल…
साहित्य
- १ वाटी साबुदाणा (रात्री भिजवलेला)
- १ लिटर दूध
- १/२ वाटी साखर (चवीनुसार)
- १/४ चमचा वेलची पूड
- बदामाचे काप (आवडीनुसार)
- पिस्त्याचे काप (आवडीनुसार)
कृती
- साबुदाणा रात्री पाण्यात भिजत ठेवा.
- एका पातेल्यात दूध गरम करा.
- दूध उकळल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा टाका. मंद आचेवर शिजवत राहा.
- साबुदाणा शिजल्यावर साखर आणि वेलची पूड टाका.
- सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा.
- तयार रबडी गरमागरम किंवा थंड झाल्यावर बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून सजवून सर्व्ह करा.
टीप
- साबुदाणा शिजवताना तळाला लागू नये म्हणून सतत ढवळत राहा.
- साखर तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
- तुम्ही यामध्ये केसर देखील घालू शकता.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..