Shravan Somwar Special Makhana Kheer: श्रावण महिन्यात जवळपास सर्वजण उपवास करतात. उपवासाला विविध पदार्थ देखील बनवले जातात. तुम्हालासुद्धा उपवासाला नवीन काहीतरी ट्राय करायचे असेल तर तुम्ही उपवासाची मखाना खीर बनवू शकता. ही रेसिपी उपवासासाठी तर उत्तम आहेच पण त्याची रेसिपीसुद्धा सोपी आहे. चला पाहूया रेसिपी…
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..
मखाना खीर बनवण्यासाठी साहित्य-
१ लिटर फुल क्रीम दूध
१०० ग्रॅम मखाना
२ चमचे तूप
१/२ वाटी साखर
४ लहान वेलची
मखाना खीर बनवण्याची रेसिपी-
सर्वप्रथम दूध उकळून घट्ट करा. मखाना तुपात तळून बाजूला ठेवा.
दूध घट्ट झाल्यावर त्यात भाजलेला मखाना घाला. ५ मिनिटे उकळल्यानंतर साखर घाला आणि गॅस बंद करा.
आता वेलची बारीक करून खीरमध्ये घाला.
तुमची स्वादिष्ट मखाना खीर तयार आहे. तुम्ही ते उपवासाला खाऊ शकता.