Mon, Dec 29, 2025

Salman Khan Birthday : 60व्या वर्षीही ‘भाईजान’चा तोच दबदबा! पनवेलमध्ये शाही वाढदिवस, धोनीसह बॉलिवूडची तुफान गर्दी

Published:
पनवेलच्या शांत वातावरणात झालेला हा भव्य सेलिब्रेशन, कुटुंबियांची उपस्थिती, इंडस्ट्रीतील मित्रांचा सहभाग आणि फॅन्सची अपार प्रेमाची दाद यामुळे सलमानचा 60वा वाढदिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला आहे
Salman Khan Birthday : 60व्या वर्षीही ‘भाईजान’चा तोच दबदबा! पनवेलमध्ये शाही वाढदिवस, धोनीसह बॉलिवूडची तुफान गर्दी

Salman Khan Birthday : सलमान खानने गुरुवारी, 27 डिसेंबर रोजी आपला 60वा वाढदिवस पनवेल येथील फार्महाऊसमध्ये अतिशय दिमाखात साजरा केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेल्या सलमानच्या या माइलस्टोन बर्थडेला फक्त बॉलिवूडच नव्हे तर क्रीडा विश्वातील मान्यवरांचीही उपस्थिती लाभली. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. धोनी विशेषतः या खास सेलिब्रेशनसाठी पनवेलला पोहोचल्याचे पाहायला मिळाले.

कोण कोण उपस्थित Salman Khan Birthday 

सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीला रणदीप हुड्डा, रकुल प्रीत सिंह, करिश्मा कपूर, संगीता बिजलानी यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमातील काही व्हिडिओज आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडिओ विशेष लक्षवेधी ठरला आहे, ज्यामध्ये सलमान खान आपल्या वडिलांचा – सलीम खान यांचा हात धरून केक कापताना दिसतात. हा क्षण पाहण्यासाठी सभोवती पाहुण्यांची मोठी गर्दी जमलेली दिसते. सर्वजण ‘हॅपी बर्थडे’ गात असताना सलमान मोठ्या आनंदात केक कापतात.

केक कापल्यानंतर सलमान आपल्या भाचीला देखील केक कापण्यास सांगताना दिसतात. विशेष म्हणजे सलमान खान आणि त्यांची भाची आयत दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दोघांनी हा विशेष दिवस एकत्र साजरा केला. कुटुंबासोबतचे असे भावनिक क्षण पाहून फॅन्सदेखील भावूक झाले आहेत. Salman Khan Birthday

व्हिडिओ चर्चेत

याशिवाय आणखी एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये सलमान पॅपराझींसोबतही केक कापताना दिसतात. स्टारडम असूनही फोटोग्राफर्सशी अतिशय साधेपणाने आणि हसतमुखाने वागणाऱ्या सलमानचा हा अंदाज पाहून चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. “एकच दिल आहे भाईजान, किती वेळा जिंकणार?” अशा अनेक प्रतिक्रियांनी सोशल मीडिया भरून गेला आहे.

दरम्यान सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी भेट तयार ठेवण्यात आली आहे. त्यांच्या आगामी चित्रपट ‘Battle of Galwan’ चा पहिला लुक आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट अपूर्वा लाखिया दिग्दर्शित करत असून चित्रांगदा सिंह यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सलमान खानचा पहिला लुक कसा असेल याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

पनवेलच्या शांत वातावरणात झालेला हा भव्य सेलिब्रेशन, कुटुंबियांची उपस्थिती, इंडस्ट्रीतील मित्रांचा सहभाग आणि फॅन्सची अपार प्रेमाची दाद यामुळे सलमानचा 60वा वाढदिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला आहे.