मुंबईतल्या ख्रिसमस सेलिब्रेशनदरम्यान आयोजित एपी ढिल्लों यांच्या दमदार कॉन्सर्टने चाहत्यांसह बॉलिवूडलाही अक्षरशः वेड लावले. संजय दत्त, तारा सुतारिया, वीर पहाडिया यांसारखे अनेक कलाकार 26 डिसेंबर रोजी Jio World Convention Centre येथे झालेल्या ‘वन ऑफ वन’ टूरच्या या शोला उपस्थित होते. स्टार्सची उपस्थिती आणि ऊर्जावान परफॉर्मन्समुळे हा कार्यक्रम खास ठरला. मात्र या संध्याकाळी सर्वात जास्त चर्चा झाली ती तारा सुतारिया आणि एपी ढिल्लों यांच्या एका व्हायरल व्हिडिओची.
किस केल्याचा व्हिडिओ व्हायरल
कॉन्सर्टदरम्यान तारा सुतारिया स्टेजवर एपी ढिल्लोंसोबत परफॉर्म करण्यासाठी आल्या. दोघांनी एकमेकांना मिठी मारत गाण्याच्या तालावर थिरकायला सुरुवात केली. याच क्षणी सिंगर एपी ढिल्लों यांनी तारा सुतारियाला किस केल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. काही सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांमध्येही याची जोरदार चर्चा सुरू आहे.
वीर पहाडिया ची रिएक्शन चर्चेत
व्हिडिओमध्ये एपी ढिल्लों पांढऱ्या आउटफिटमध्ये आणि तारा सुतारिया काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. किसनंतर ते ताराचा हात धरून तिला स्टेजच्या पुढच्या बाजूला नेताना दिसतात. या सगळ्यावर तारा सुतारियाच्या बॉयफ्रेंड वीर पहाडिया यांचा रिएक्शनही प्रेक्षकांनी टिपला आहे. ते थोडेसे आश्चर्यचकित चेहऱ्याने गाणं गाताना दिसतात, आणि त्यांची ही मुद्रा नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
कॉन्सर्टमध्ये संजय दत्तने केलेली धडाकेबाज एन्ट्री देखील तितकीच चर्चेत होती. परंतु तारा–ढिल्लोंचा स्टेजवरील हा क्षण मात्र सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड करत आहे. अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत असून काहींनी हा किस “अनएक्स्पेक्टेड”, तर काहींनी “कॉन्सर्टचा हायलाइट” असे म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एपी ढिल्लोंचा ‘वन ऑफ वन’ टूर देशभरात मोठ्या प्रमाणात हिट ठरत असून मुंबईतील हा परफॉर्मन्स त्यातील सर्वात चर्चित शो ठरला आहे. तारा आणि एपीच्या या व्हायरल क्षणाने त्यात अधिकच रंगत आणली आहे.





