एकीकडे राज्यभर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. अशातच मराठा आरक्षणाच्या लढ्याचे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि दगदगीमुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता. मात्र, आज ताप भरल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मनोज जरांगेंवर गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू
डॉक्टरांकडून मनोज जरांगेंना सक्त विश्रांतीचा सल्ला
प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने गॅलक्सी रुग्णालयात दाखल केलं. सध्या डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे देखील समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाज बांधव आणि त्यांच्या समर्थकांनी गॅलक्सी रुग्णालयाबाहेर रंगाच्या रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचाच सल्ला दिला आहे. तसंच त्यांना सध्या कोणालाही भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकी जरांगेंची प्रकृती कशी सुधारते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





