महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. शनिवार, 27 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये दराची एकूण काय स्थिती राहिली, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी बाजारात आज शेतमालाच्या दरात पुन्हा चढ उतार दिसून येत आहेत. कांद्याचे दरही काहीसे कमी झाले आहेत. मात्र, सोयाबीनच्या दरांमध्ये आज स्थिरता कायम राहिली आहे.
कांद्याच्या दरामध्ये काहीशी घसरण
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज 1 लाख 26 हजार 811 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 43 हजार 450 क्विंटल सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 100 ते 2900 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. सोलापूर मार्केटमध्ये आज कांद्याला सर्वाधिक बाजार भाव मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी
सोयाबीनच्या दरात कमालीची स्थिरता
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 49 हजार, 296 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 17 हजार 634 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4132 ते 4947 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 257 क्विंटल सोयाबीनला 5328 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोयाबीनचे दर आज स्थिर आहेत.





