मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, 16 तारखेला निकाल जाहीर होईल. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि शिवसेना-भाजपच्या महायुतीपैकी कोणाची सरशी होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भाजपामधील जागावाटपाच्या संदर्भात एक मोठी बातमी खरंतर समोर येत आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यातील महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असून 207 जागांवर एकमत झालं आहे. 20 जागांवरील चर्चा सुरू असून लवकरच पहिली यादी जाहीर होणार आहे.
207 जागांचं वाटप ठरल्याची माहिती
मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील महायुतीचे जागावाटप जागा वाटप अंतिम टप्प्यात असून 207 जागांवर एकमत झालं आहे. 20 जागांवरील चर्चा सुरू असून लवकरच पहिली यादी जाहीर होणार आहे. भाजप शिवसेनेची आज एकत्रित बैठक झाली, जनसभा नियोजन आणि संयुक्त सभा, जागावाटपाची ही चर्चा झाली आहे. भाजप 128 जागा, शिवसेना 79 जागा अशा 207 जागांवर एकमत झालेला आहे. उर्वरित 20 जागांची चर्चा सुरू असून राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊन घडलेल्या विविध जागांचा तोडगा काढण्यात येईल. समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून उर्वरित जागांवर भाजपा लढणार की शिवसेना लढणार याचा निर्णय घेऊ, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.
महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल काही दिवसांपूर्वी वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 25 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.
महत्वाच्या तारखा
अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवार माघारीची मुदत – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी – ३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणी तारीख – १६ जानेवारी २०२६





