Sat, Dec 27, 2025

Akshay Khanna : दृश्यम 3 मधून अक्षयची एक्झिट!! 21 कोटींच्या फी मुळे गेम झाला?

Published:
,‘छावा’ आणि ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्ना ने ‘दृश्यम 3’ साठी तब्बल 21 कोटी रुपयांची फी मागितली होती. मात्र बजेट वाढेल या कारणास्तव निर्मात्यांनी ती मागणी मान्य केली नाही
Akshay Khanna : दृश्यम 3 मधून अक्षयची एक्झिट!! 21 कोटींच्या फी मुळे गेम झाला?

Akshay Khanna : दृश्यम 3 या बहुचर्चित चित्रपटातून अभिनेता अक्षय खन्ना बाहेर पडल्याची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ‘धुरंधर’मध्ये रहमान डकैतच्या भूमिकेसाठी विशेष चर्चेत असलेले अक्षय खन्ना ‘दृश्यम 3’ मध्ये पुन्हा एकदा IG तरुण अहलावतच्या भूमिकेत दिसणार अशी अपेक्षा होती. परंतु निर्माते आणि कलाकार यांच्यातील मतभेदांमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

पॅनोरामा स्टुडिओजचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे की चित्रपटात अक्षय खन्ना ऐवजी जयदीप अहलावत दिसणार आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की अक्षयच्या वाढीव फीच्या मागणीमुळे तणाव निर्माण झाला होता. निर्मात्यांनी सांगितले की फीबाबत तीन वेळा चर्चा झाली, मात्र तोडगा निघाला नाही.

अक्षयने फोन उचलला नाही (Akshay Khanna)

याशिवाय, प्रोडक्शन हाऊसचा दावा आहे की अक्षयनी अचानक फोन उचलणे बंद केले. त्यामुळे आता कंपनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. कुमार मंगत यांच्या मते, चित्रपटातील त्यांच्या पात्राच्या लुक—विशेषतः IG तरुण अहलावतच्या हेअरस्टाइलबाबत—अक्षय खन्नांशी मतभेद झाले होते. प्रोडक्शन टीमने हे मुद्दे मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु संवादच न झाल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. Akshay Khanna

अक्षयने किती फी मागितली

याआधी आलेल्या अहवालांनुसार, ‘छावा’ आणि ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्ना ने ‘दृश्यम 3’ साठी तब्बल 21 कोटी रुपयांची फी मागितली होती. मात्र बजेट वाढेल या कारणास्तव निर्मात्यांनी ती मागणी मान्य केली नाही. याचदरम्यान अक्षय यांनी चित्रपटात विग परिधान करण्याची मागणीही केल्याची माहिती समोर आली आहे.

दृश्यम फ्रॅंचायझीत अक्षयने 2022 मध्ये तरुण अहलावतची भूमिका साकारली होती. त्यांचे पात्र अजय देवगनच्या विजय सलगावकरला IG मीरा देशमुखच्या मुलगा सॅम यांच्या मर्डर केस मध्ये दोषी ठरवण्याच्या मिशनवर होते. या दमदार भूमिकेमुळे त्यांची कामगिरी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली होती. आता त्यांच्या ऐवजी जयदीप अहलावतची निवड झाल्याने ‘दृश्यम 3’ बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. पुढे या प्रकरणात कायदेशीर कारवाई होते का आणि चित्रपटाच्या कास्टिंगवर याचा कितपत परिणाम होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.