Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी केली मोठी घोषणा

Published:
खरंतर राज्यात यावर्षी पावसाचा मोठा हा हाहाकार पाहायला मिळाला.... खास करून मराठवाडा आणि विदर्भात वरुणराजा धो धो बरसला
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी केली मोठी घोषणा

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना (Agriculture News) नुकसान भरपाई देण्यात आली आहे. आता बाकीच्या राहिलेल्या क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत अशी मोठी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दत्तात्रय भरणे यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खरंतर राज्यात यावर्षी पावसाचा मोठा हा हाहाकार पाहायला मिळाला…. खास करून मराठवाडा आणि विदर्भात वरुणराजा धो धो बरसला …. रस्ते नाले दुधड्या भरून वाहू लागले… शेतकऱ्याच्या शेतातही (Agriculture News) पाणीच साठल आहे. उभं पीक पाण्याखाली गेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला असून सरकारकडून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे… या बळीराजाला दत्तात्रय भरणे यांनी आता दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं म्हणत दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्याला धीर दिला आहे.

195 तालुक्यांना पावसाचा फटका- Agriculture News

दत्तात्रय भरणे म्हणाले, मागील दोन महिन्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तब्बल 30 जिल्ह्यांतील 195 तालुक्यांना या पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टी मुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 17 लाख 85 हजार 714 हेक्टर (42 लाख 84 हजार 846 एकर) क्षेत्र बाधित झाले आहे. या काळात 654 महसूल मंडळांमधील खरीप पिके धोक्यात आली आहेत. खास करून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता सरकारने शेतकर्‍यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वाधिक बाधित जिल्हे

नांदेड – 728,049 हेक्टर
वाशीम – 203,098 हेक्टर
यवतमाळ – 318,860 हेक्टर
धाराशिव – 1,57,610 हेक्टर
अकोला – 177,466 हेक्टर
सोलापूर – 47,266 हेक्टर
बुलढाणा – 89,782 हेक्टर

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews