Bank Of Maharashtra Recruitment : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांची भरती; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Published:
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, एकूण ६०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात.
Bank Of Maharashtra Recruitment : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांची भरती; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Bank Of Maharashtra Recruitment : जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल आणि तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, एकूण ६०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात.

अप्रेंटिसशिप म्हणजे काय?

अप्रेंटिसशिप ही प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण प्रक्रिया आहे. यात उमेदवारांना बँकेत प्रत्यक्ष काम करताना दैनंदिन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते. ही अप्रेंटिसशिप साधारणतः ६ महिने ते १ वर्ष कालावधीची असते. या कालावधीत मिळणारा अनुभव पुढील नोकरीच्या संधींसाठी उपयुक्त ठरतो.

महत्त्वाच्या अटी व पात्रता (Bank Of Maharashtra Recruitment)

एकूण पदे: ६००
पदाचे नाव: अप्रेंटिस
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ जानेवारी २०२६
वयोमर्यादा: २० ते २८ वर्षे
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण

भाषा अट: स्थानिक भाषा येणे आवश्यक (१०वी व १२वी मध्ये स्थानिक भाषेत शिक्षण घेतलेले असावे)

निवड प्रक्रिया: कोणतीही लेखी परीक्षा नाही; मेरिट बेसिसवर निवड केली जाणार आहे

आवश्यक कागदपत्रे: १०वी, १२वी आणि पदवीची मार्कशीट (Bank Of Maharashtra Recruitment)

अर्ज कसा कराल?

सर्वप्रथम bankofmaharashtra.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
नवीन उमेदवार असल्यास रजिस्ट्रेशन करा
युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा
अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा
आवश्यक फोटो आणि सही अपलोड करा
अर्ज सबमिट करण्यापूर्वी त्याचा प्रिंटआउट काढून ठेवा

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews