10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सीबीएसई बोर्डाकडून या तारखा (CBSE Board Exams 2026) जाहीर करण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरू होतील तर 9 एप्रिल 2026 ला शेवटचा पेपर असेल. म्हणजेच काय तर आता विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी साडेतीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर पाहता येणार आहे.
कसं आहे परीक्षेचे वेळापत्रक? CBSE Board Exams 2026
बोर्डाच्या वेळापत्रकानुसार, सीबीएसई 10 वी परीक्षा यंदा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 मध्ये असणार आहे. तर, सीबीएसई 12 वी परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 पर्यंत असेल. परीक्षेच्या वेळेबाबत सांगायचं झाल्यास, सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत पेपर असणार आहेत. सीबीएसईच्या मते, भारत आणि इतर 26 देशांमधून अंदाजे 45 लाख विद्यार्थी 204 विषयांसाठी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसतील. लेखी परीक्षांसोबतच, निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी प्रॅक्टिकल, मूल्यांकन आणि निकाल जाहीर करण्याचे काम केले जाईल. CBSE Board Exams 2026
परीक्षेचे वेळापत्रक कुठ बघणार?
कोणत्या तारखेला कोणत्या विषयाचा पेपर आहे याची माहिती सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिवाय हे वेळापत्रक विद्यार्थी किंवा पालक डाऊनलोडही करु शकतात. ज्या कुटुंबात सीबीएसई (CBSE) बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी हे वेळापत्रक डाउनलोड करून घ्यावे.






