Central Railway Update: मध्य रेल्वेने रविवारी २८ सप्टेंबर २०२५ रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सुरळीत रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी ट्रॅक दुरुस्ती आणि अभियांत्रिकी पडताळणीसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. याकाळात मुंबई विभागातील अनेक लोकल आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होईल.
हे ही वाचा
विद्या विहार-ठाणे मुख्य मार्ग बंद असणार-
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, विद्या विहार आणि ठाणे दरम्यानच्या मुख्य मार्गावर ५ व्या आणि ६ व्या ट्रॅकवर सकाळी ८ ते दुपारी १.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. याव्यतिरिक्त ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यानच्या अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरही सकाळी ११.१० पासून दुपारी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असेल.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे कि, मेगा ब्लॉक दरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या मेल/ एक्प्रेस गाड्यांना वळवण्यात येईल.त्यामुळे या गाड्यांना गतंव्यस्थानावर पोहोचण्यास १० ते १५ मिनिटे उशीर होऊ शकतो.
मेगा ब्लॉकमुळे विलंब होणाऱ्या गाड्या-
डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या (एलटीटीहून सुटणाऱ्या)-
११०५५ एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस
११०६१ एलटीटी-जयनगर पवन एक्सप्रेस
१६३४५ एलटीटी-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
१७२२२ एलटीटी-काकीनाडा एक्सप्रेस
या सर्व गाड्या विद्या विहार स्टेशनवर डाउन फास्ट लाईनवर वळवल्या जातील आणि ठाणे येथे पाचव्या लाईनवर वळवल्या जातील.
अप मेल/एक्सप्रेस गाड्या (गंतव्यस्थान सीएसएमटीसह)-
११०१० पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
१२१२४ पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
१२१२६ पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस
१२१४० नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस
२२२२६ सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
१२३२१ हावडा-सीएसएमटी मेल
११०१२ धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस
या सर्व गाड्या ठाणे येथे अप फास्ट मार्गावर वळवल्या जातील आणि त्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.
अप मेल/एक्सप्रेस गाड्या (एलटीटी गंतव्यस्थान)-
१३२०१ राजगीर-एलटीटी एक्सप्रेस
१७२२१ काकीनाडा-एलटीटी एक्सप्रेस
१२१६८ वाराणसी-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस
१२८१२ हटिया-एलटीटी एक्सप्रेस
या गाड्या ठाणे येथे अप फास्ट लाईनवर वळवल्या जातील आणि विद्या विहार येथे सहाव्या लाईनवरून मार्ग बदलतील. त्यामुळे १० ते १५ मिनिटे विलंब होण्याची शक्यता आहे.
ट्रान्स-हार्बर लाईन सेवांवर परिणाम होईल-
ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यानच्या अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा रविवारी सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत पूर्णपणे बंद राहतील.
ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल पर्यंतच्या डाऊन लाईन सेवा सकाळी १०:३५ ते दुपारी ४:०७ पर्यंत बंद राहतील.
पनवेल/नेरुळ/वाशी ते ठाणे पर्यंतच्या अप लाईन सेवा सकाळी १०:२५ ते दुपारी ४:०९ पर्यंत बंद राहतील.