छत्रपती शिवाजी महाराज ’भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, सीएसएमटी स्थानकावरून सोमवारी होणार रवाना

Written by:Astha Sutar
Published:
यामध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे. ही रेल्वे  प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, कसबा गणपती, शिवसृष्टी आदी ठिकाणांना भेट देणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज ’भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, सीएसएमटी स्थानकावरून सोमवारी होणार रवाना

Bharat Gaurav Tourist Railway : जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि पराक्रम हे जाणून घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.

सोमवारी किती वाजता?

दरम्यान, उद्या सोमवारी (9 जून 2025) रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे” ही रेल्वे रवाना होणार आहे. ही यात्रा प्रवाशांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अनुभव देईल. सोयीसुविधा, सांस्कृतिक समृद्धी आणि सहजतेवर भर देणारी ही रेल्वे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. या रेल्वेतून जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करत महाराजांच्या इतिहास माहित करुन घेण्याची संधी असल्याचे राज्य सरकारने म्हटले होते.

किती दिवसांची दिवसांची सहल?

IRCTC, रेल्वे मंत्रालय, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे” ही रेल्वे चालवली जाणार आहे. या विशेष म्हणजे ही पाच दिवसांची सहल असणार आहे. यामध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे. ही रेल्वे  प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, कसबा गणपती, शिवसृष्टी आदी ठिकाणांना भेट देणार आहे. त्यामुळं जे शिवभक्त असतील त्यांच्यासाठी ही पाच दिवसांची संधी असल्याचे बोलले जात आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews