Pik Vima Yojana : वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झालं? या योजनेतून मिळणार भरपाई

Published:
वन्य प्राण्यांमुळे आजकाल पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत आहे. जे पीक मोठ्या कष्टाने पिकवलं, मोठ केलं, तेच पिक प्राण्यांमुळे मातीमोल होत असल्याचे पाहून बळीराजा हतबल होतोय
Pik Vima Yojana : वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झालं? या योजनेतून मिळणार भरपाई

Pik Vima Yojana : वन्य प्राण्यांमुळे आजकाल पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत आहे. जे पीक मोठ्या कष्टाने पिकवलं, मोठ केलं, तेच पिक प्राण्यांमुळे मातीमोल होत असल्याचे पाहून बळीराजा हतबल होतोय. अशावेळी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार कडून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारे पीक नुकसान तसेच मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भातपिके पाण्याखाली जाणे या दोन्ही प्रकारच्या नुकसानींचा समावेश आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PMFBY) करण्यात आला आहे. ही तरतूद खरीप 2026 पासून लागू होणार असून देशभरातील लाखो शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे.

खरं तर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून (Pik Vima Yojana) आर्थिक संरक्षण देण्यासाठीच सरकार कडून पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती. वादळ, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. आता यामध्ये आणखी बदल करत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारे पीक नुकसान तसेच मुसळधार पावसामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळेल. भारतात खास करून रानडुक्कर, हरीण , माकडे, बिबट्या यांसारख्या प्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठं नुकसान होत. आता या नुकसानीला स्थानिक जोखीम श्रेणी अंतर्गत पाचवा अतिरिक्त विमा कव्हर म्हणून ओळखले जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे डोंगराळ प्रदेश वनक्षेत्रांजवळील भाग, जंगलाजवळ शेती असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोणाला फायदा मिळणार – Pik Vima Yojana

या योजनेचा फायदा महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड ,उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना होईल.

शेतकऱ्यांना करावे लागेल हे काम – Pik Vima Yojana

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत पिकांचे जिओ-टॅग केलेले फोटो पीक विमा ॲपवर अपलोड करणे गरजेचं आहे. फोटो अपलोड केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून त्वरित पंचनामा आणि पडताळणी केली जाईल.

राज्य सरकारचे काम काय?

देशातील राज्य सरकारांना पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांची अधिकृत यादी जाहीर करावी लागेल सर्वाधिक नुकसान होणारे जिल्हे आणि विमा केंद्रे ओळखावी लागतील. यामुळे आगामी हंगामात विमा प्रक्रिया अधिक अचूक आणि प्रभावी होईल.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews