Marathi News

पावसाळ्यात वीज कोसळून जीव गमावण्याची भीती; अशी घ्या स्वत:ची काळजी

Written by:Rohit Shinde
Published:
दरवर्षी भारतात अनेक लोक वीज कोसळून मृत्युमुखी पडतात. त्यामुळे वीज पडत असताना योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शेतात काम करत असाल, रस्त्यावर असाल किंवा कारमध्ये असाल तरी काही मूलभूत नियम पाळल्यास स्वतःचा जीव वाचवता येतो.
पावसाळ्यात वीज कोसळून जीव गमावण्याची भीती; अशी घ्या स्वत:ची काळजी

पावसाळ्यात वीज कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. ढगांमधील घर्षणामुळे निर्माण होणारी ही वीज अनेकदा जमिनीवर कोसळते आणि त्यामुळे प्राणहानीसुद्धा होऊ शकते. दरवर्षी भारतात अनेक लोक वीज कोसळून मृत्युमुखी पडतात. त्यामुळे वीज पडत असताना योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शेतात काम करत असाल, रस्त्यावर असाल किंवा कारमध्ये असाल तरी काही मूलभूत नियम पाळल्यास स्वतःचा जीव वाचवता येतो.

वीज पडण्याचे संकेत ओळखा:

पावसाआधी आकाशात गडगडाट, विजांचा कडकडाट होणे, केस थोडेसे उभे राहणे, अंगावर रोमांच उभे राहणे किंवा धातूच्या वस्तूंना थरथराट जाणवणे हे वीज कोसळण्याचे लक्षण असू शकतात. अशा वेळी त्वरित सुरक्षित स्थळी जावे.

शेतात असताना काळजी कशी घ्यावी:

  1. पावसाळ्यात शेतात काम करताना आकाशात विजा चमकू लागल्यास तात्काळ उघड्यावरून सुरक्षित ठिकाणी जावे.
  2. उंच झाडांखाली उभे राहू नका, कारण वीज सर्वात आधी उंच ठिकाणीच कोसळते.
  3. धातूच्या वस्तूंपासून दूर राहा – नांगर, कुदळ, वावरी या वस्तूंना स्पर्श करू नका.
  4. शक्य असल्यास जमिनीवर दोन्ही पाय एकत्र करून बसावे, हात गुडघ्याला लावून डोके झाकावे.

रस्त्यावर किंवा कारमध्ये असताना काय करावे:

  1. तुम्ही गाडी चालवत असताना वीज चमकत असल्यास शक्य तितक्या लवकर कार रस्त्याच्या कडेला थांबवा आणि कारमध्येच सुरक्षित राहा.
  2. कारचे सर्व दरवाजे बंद ठेवा, खिडक्या उघडू नका आणि धातूच्या भागांना स्पर्श करू नका.
  3. बाईकवर किंवा सायकलवर असाल तर शक्य असल्यास एखाद्या सुरक्षित घरामध्ये आसरा घ्या.
  4. झाडाखाली थांबू नका, उंच पोल किंवा टॉवरपासून दूर रहा.

सर्वसामान्य उपाय:

  • पावसाळ्यात हवामान खात्याचे सतत अपडेट्स पहा.
  • विजेच्या काळात मोबाईल चार्जिंग, घरातील विजेची उपकरणे वापरणे टाळा.
  • शक्य असल्यास लाकडी किंवा रबर सोल असलेल्या चपला वापरा, ज्या थोडा सुरक्षितपणा देतात.

वीज कोसळणे हा निसर्गाचा भाग असला तरी योग्य खबरदारी घेतल्यास जीवितहानी टाळता येते. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, जागरूक राहा आणि सुरक्षित राहा.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews