Flipkart Republic Day Sale 2026 : नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही जर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे मोबाईल फ्रिज लॅपटॉप किंवा वॉशिंग मशीन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट ने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही रिपब्लिक सेल आयोजित केला आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्ही कोणते वस्तू अतिशय स्वस्तात आणि कमी किमतीत खरेदी करू शकतात.
कधीपासून सुरू होणार सेल (Flipkart Republic Day Sale 2026)
फ्लिपकार्टवरील रिपब्लिक डे सेल १७ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल. प्रत्येक सेलप्रमाणे, प्लस आणि ब्लॅक सदस्यांसाठी रिपब्लिक डे सेल २४ तास आधी, एक दिवस आधी सुरू होईल. अर्ली अॅक्सेस ग्राहकांना अधिक फायदे आणि रोमांचक ऑफर मिळतील. सेल दरम्यान एचडीएफसी बँक कार्ड पेमेंटवर सवलत दिली जाईल. Flipkart Republic Day Sale 2026
हे ही वाचा
कोणकोणत्या वस्तूंवर बंपर सूट??
फ्लिपकार्ट च्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ट्रू वायरलेस स्टीरिओ (TWS) इयरबड्स अतिशय स्वस्तात तुम्हांला मिळणार आहे. याशिवाय रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, ब्लूटूथ स्पीकर्स आणि वियरेबल डिव्हाइसेसवर ‘सुद्धा मोठी सूट देण्यात येणार आहे. या सवलतींव्यतिरिक्त, ग्राहक EMI वर देखील वस्तूंची खरेदी करू शकतात. शिवाय, तुम्ही तुमचे जुने फोन आणि गॅझेट चांगल्या किमतीत विकू शकता आणि एक्सचेंज बोनस मिळण्याची अपेक्षा देखील करू शकता.