आनंदाची बातमी! रेल्वेचे तिकीट आता 4 तासाऐवजी 24 तास आधी कन्फर्मेशन समजणार, नवीन नियम काय आहेत?

Written by:Astha Sutar
Published:
रेल्वेच्या आयआरसीटीवरून रेल्वे एक्सप्रेसचे तिकीट बुक केले जाते. मात्र आता रेल्वेचे तिकीट बुक केल्यानंतर 24 तासाच्या आधीच आपले तिकिट कन्फर्मेशन झाले की हे समजणार आहे. यासाठी आधी कन्फर्मेशनसाठी चार तासाचा अवधी होता.
आनंदाची बातमी! रेल्वेचे तिकीट आता 4 तासाऐवजी 24 तास आधी कन्फर्मेशन समजणार, नवीन नियम काय आहेत?

Railwary Ticket Confirmation – जर तुम्ही बाहेरगावी किंवा फिरायला जाण्यासाठी एक्सप्रेस रेल्वेचे तिकीट बुक करत असाल  तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आहे. कारण रेल्वेने प्रवास करण्यासाठी अनेकजण ऑनलाईन तिकीट बुक करतात. मात्र आपले तिकीट कन्फर्मेशन झाले की नाही? हे यापूर्वी चार तास आधी समजायचे, मात्र आता 24 तास आधी समजणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, प्रवाशांना अधिकचा वेळ मिळणार आहे.

१ जुलैपासून नवीन नियमात बदल

दरम्यान, रेल्वेच्या आयआरसीटीवरून रेल्वे एक्सप्रेसचे तिकीट बुक केले जाते. मात्र आता रेल्वेचे तिकीट बुक केल्यानंतर 24 तासाच्या आधीच आपले तिकिट कन्फर्मेशन झाले की हे समजणार आहे. यासाठी आधी कन्फर्मेशनसाठी चार तासाचा अवधी होता. आधी चार तास चार्ट बनायचा आणि समजायचे. परंतु आता 24 तास आधी समजणार असल्यामुळे प्रवाशांना पर्याय व्यवस्था करण्यासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे. आणि त्यांना रेल्वे किंवा अन्य प्रवासाचे साधन निवडता येणार आहे. तसेच हा नियम एक जुलैपासून आयआरसीटीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांकडून आनंद व्यक्त…

दुसरीकडे यापूर्वी एक्सप्रेस रेल्वेचे तिकीट बुक बाहेरगावी फिरण्यासाठी किंवा आपल्या गावी जाण्यासाठी… सुट्टीच्या काळामध्येत दोन-दोन महिने आधी एक्सप्रेस रेल्वेचे तिकीट बुक करावं लागत असे. मात्र दोन महिने तिकीट बुक केल्यानंतरही आपले तिकीट कन्फर्मेशन झाले की नाही? हे चार तास आधी समजायचे. रेल्वेचा कन्फर्मेशनचा चार्ट रेल्वेच्या वेळेच्या आधी चार तास समजायचा. मात्र आता 24 तास आधी कन्फर्मेशन समजणार असल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला असून, अन्य प्रवासाचे पर्याय साधन व्यवस्था निवडता येणार आहे. असेही प्रवाशाकडून सांगण्यात येत आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews