आनंदाची बातमी! गणेश उत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष मध्यरात्री लोकल सेवा, किती अतिरिक्त गाड्या?

Written by:Astha Sutar
Published:
मध्य आणि हार्बर मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या ०६/०७.०९.२०२५ रोजी (शनिवार/रविवार रात्री) गणपती विसर्जनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी धावतील.
आनंदाची बातमी! गणेश उत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष मध्यरात्री लोकल सेवा, किती अतिरिक्त गाड्या?

Central Railway – गणेश उत्सवादरम्यान, गणेश भक्त मोठ्या प्रमाणात रेल्वे लोकलने प्रवास करतात. या गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण/ठाणे व परतीसाठी विशेष मध्यरात्री उपनगरी सेवा चालवण्यात येणार आहेत. या गाड्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान ४/०५.०९.२०२५ (गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री),०५/०६.०९.२०२५ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्री) आणि ०६/०७.०९.२०२५(शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी धावणार आहेत. त्यामुळं गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना प्रवासासाठी अतिरिक्त लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे.

हार्बर मार्गावर कोणत्या दिवशी?

दरम्यान, हार्बर मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या ०६/०७.०९.२०२५ रोजी (शनिवार/रविवार रात्री) गणपती विसर्जनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी धावतील. विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर धावणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गाचे वेळा पत्रक कसे?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल.

सीएसएमटी ते ठाणे विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल.

सीएसएमटी ते कल्याण विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४.५५ वाजता पोहोचेल.

कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी कल्याण येथून ००:०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०१:३० वाजता पोहोचेल.

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी ठाणे येथून ०१:०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२:०० वाजता पोहोचेल.

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी ठाणे येथून ०२:०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३:०० वाजता पोहोचेल.

डाउन हार्बर मार्गावर कोणत्या दिवशी?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.३० वाजता सुटेल व पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२.४५ वाजता सुटेल व पनवेल येथे ०४.०५ वाजता पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर (०६/०७.०९.२०२५ रोजी)

पनवेल–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२.२० वाजता पोहोचेल.

पनवेल–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.

दरम्यान, या अतिरिक्त गाड्या रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या आहेत, त्याची प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी व या गणेशोत्सव विशेष उपनगरी गाड्यांचा लाभ घ्यावा, असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.