एचएसआरपी नंबर प्लेट अद्यापर्यंत किती जणांनी बदलल्या? सर्वांधिक नोंदणी कोणत्या जिल्ह्यात?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
चौथ्यांदा १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आणि ही शेवटची मुदतवाढ आहे, त्यामुळं शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे १५ ऑगस्टपर्यंत अवघे २० दिवस शिल्लक असताना अद्यापर्यंत किती जणांनी नंबर प्लेट बदलल्या आहेत, पाहूया...
एचएसआरपी नंबर प्लेट अद्यापर्यंत किती जणांनी बदलल्या? सर्वांधिक नोंदणी कोणत्या जिल्ह्यात?

HSRP Number plate : केंद्र सरकारने २०१९ च्या अगोदरच्या सर्व दुचाकी, चारचाकी वाहनांना नव्या नंबरप्लेट बसवण्याचे आदेश दिले आहेत. नवीन नंबर प्लेट अर्थात एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. आणि याकरिता जे वाहनांवर नवीन नंबर प्लेट बसवणार नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही सरकारने म्हटले आहे. यापूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बदलण्यासाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

२२ जुलैपर्यंत एकूण ५२ लाख ५० हजार अर्ज…

केंद्र सरकारच्या आदेशनंतर नवीन नंबर प्लेट लवकर लावा, असं राज्य सरकारच्या महाराष्ट्र परिवहन विभागाने म्हटलं होतं. २०१९ पूर्वीचे महाराष्ट्रात दुचाकी व चारचाकी अशा मिळून एकूण अंदाजे २ करोड गाड्या आहेत. त्यातील साधारण ३५ लाख गाड्यांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवल्यात. तर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी जवळपास २२ जुलैपर्यंत एकूण ५२ लाख ५० हजार वाहनधारकांनी अर्ज केल्याची माहिती महाराष्ट्र परिवहन विभागाने दिली आहे. त्यातील ३५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना एचएसआरपी नंबर बसविले आहेत.

नंबर प्लेटसाठी कशी आहे प्रक्रिया?

– नंबरप्लेटसाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागते.
– एचएसआरपीची किंमत वाहनाचे प्रकार आणि नंबर प्लेटच्या आकारानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.
– शुल्क जीएसटीसह ऑनलाइनच भरावे लागते.
– यानंतर फिटमेंट सेंटरवर जाऊन निवडलेल्या तारखेला वेळेत जाऊन फिटिंग करून घ्यावी लागते.

सर्वांधिक नोंदणी कुठे?

दरम्यान, या नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी राज्यातील आरटीओ कार्यालयांसाठी तीन झोनमध्ये तीन वेगवेगळ्या संस्थांची नेमणूक करण्याती आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट नोंदणीसाठी राज्यातील ३ झोनमध्ये कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, मुंबई सेंट्रल, बोरिवली, कल्याण, पेण आदींसह राज्यातील १६ आरटीओंच्या झोनमध्ये सर्वांधिक नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे.