नवी दिल्ली – सध्याच्या युगात भेसळयुक्त, पॅकेजिंग आणि प्रोसेस फूडनं आपल्या जीवनशैलीत मोठी जागा घेतली आहे. प्रत्येक घराघरात हेच चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे आजारपणाचा धोकाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
इंडियन कौन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी एक अहवाल तयार केला असून यानुसार भारतातील सुमारे 56.4 टक्के देशवासीयांच्या आजारपणाचा संबंध त्यांच्या खाण्यापिण्याशी निगडीत आहे. हा आकडा चिंताजनक असून खाण्यापिण्याच्या सवयींवर काम करण्याची गरज व्यक्त करणारा आहे.
यावर मात करण्यासाठी काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात. त्यानुसार आहार केल्यास आजारमुक्त जीवन शक्य असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.
काय आहेत गाईडलाईन्स?
1.प्रत्येक दिवशी जेवणात वैविध्य असाव, यामुळे शरिराला सर्व पोषक तत्व मिळतील
2. गर्भवती आणि ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिलांनी या वैविध्यपूर्ण खाण्याची जास्त काळजी घ्यावी
3. जन्मानंतर बाळशाला सहा महिने केवळ आईचं दूधच द्यावं, 2 वर्षांपर्यंत व्रेस्ट फिडींग थांबवू नये.
4. 6 महिन्याच्या बाळाला घरात शिजवलेले हलकं आणि पचनयुक्त आहार द्यावा
5. लहान मुलांच्या विकासासाठी संतुलित आणि योग्य न्यूट्रिशन सुनिश्चित करावेत.
6. प्रत्येक दिवसाच्या भोजनात भाज्यांचा आणि डाळींचा समावेश असावा
7. तेल आणि ट्रान्स फॅटचं सेवन कमी करावं, शेंगदाणे, बिया यांचा जेवणात समावेश असावा
8. शरिरासाठी हेल्दी प्रोटिन घ्या, मात्र पावडर आणि सप्लिमेंट घेणं टाळा
9. पोटाची चरबी आणि जाडेपणा वाढू देवू नका, यासाठी हेल्दी लाईफस्टाईल आवश्यक आहे.
10. दर दिवशी फिजिकल एक्टिव्हिटी आणि व्यायाम जरुर करा.
11. डब्यात बंद असलेलं प्रोसेस फूड आणि मिठाचं खाण्यातील प्रमाण कमी करा
12. स्वच्छ हातांनी आणि चांगल्या ठिकाणी बनवलेलं अन्नच ग्रहण करा
13. स्वयंपाक करण्यासाठी आधी आणि नंतरही योग्य रितीचा वापर करा.
14. दिवसभरात किमान 7 ते 8 ग्लास पाणी नक्की प्या
15. जास्त तेल, साखर, मिठ आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खावू नका.
16. वयस्कर व्यक्तींच्या आहारात पोष्टिक पदार्थांचा समावेश करा
17. पॅकेज्ड फूड खरेदी करताना त्यावरील दिलेली माहिती आवर्जून वाचा
2000 कॅलरी अन्नासाठी चांगली फूड प्लेट
1. डाळी, राजमा, हरबरा 85 ग्रॅम- 274 कॅलरी
2. बदाम, शेंगदाणे,सूर्यफूल बीया 35 ग्रॅम – 181 कॅलरी
3. दूध आणि दही ( बिनासाखर 300 मिमी)- 216 कॅलरी
4. मान्सूननुसार फळं 100 ग्रॅम – 56 कॅलरी
5. हिरव्या भाज्या 400 ग्रॅम- 174 कॅलरी
6. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ( 250 ग्रॅम) – 843 कॅलरी
7. शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल 27 ग्रॅम- 243 कॅलरी





