मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावरही आता गारेगार प्रवास, प्रजासत्ताक दिनापासून हार्बरवर धावणार एसी लोकल

Written by:Smita Gangurde
Published:
या नव्या एसी लोकलमुळे यंदाच्या उन्हाळ्यात पश्चिम रेल्वेसह, हार्बर रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.
मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावरही आता गारेगार प्रवास, प्रजासत्ताक दिनापासून हार्बरवर धावणार एसी लोकल

मुंबई – मुंबईतल्या हार्बर रेल्वेमार्गावरही आता गारेगार प्रवास करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर १४ एसी लोकल धावणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही एसी लोकलच्या संख्येत वाढ होणार
आहे

सहा वर्षांनी पुन्हा धावणार एसी लोकल

हार्बर रेल्वे मार्गावर सहा वर्षांनी पुन्हा एसी लोकल धावणार आहेत. यापूर्वी १ डिसेंबर २०२१ ला हार्बरवर एसी लोकल सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र एसी लोकलच्या तिकीट-पासचे दर अधिक असल्यानं या एसी लोकलला कमी प्रतिसाद होता.

त्यातच सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी झाल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर हार्बर मार्गावरील एसी लोकल पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. आता प्रजासत्ताक दिनापासून पुन्हा एकदा सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर १४ एसी लोकल धावणार आहेत.

हार्बर मार्गावर एसी लोकलचं वेळापत्रक

हार्बर मार्गावरील लोकलचं वेळापत्रक कसं असेल त्यावरही एक नजर टाकूयात.

अप
1. पहाटे 4.15 – वाशी-वडाळा रोड
2. सकाळी 6.17- पनवेल-सीएसएमटी
3. सकाळी 9.09- पनवेल-सीएसएमटी
4. दुपारी 12.03- पनवेल-वडाळा रोड
5. दुपारी 2.31- पनवेल-सीएसएमटी
6. दुपारी 4.55- वाशी-वडाळा रोड
7. संध्या. 6.37- पनवेल-सीएसएमटी

डाऊन
8. सकाळी 5.06- वडाळा रोड-पनवेल
9. सकाळी 7.40- सीएसएमटी-पनवेल
10. सकाळी 10.34 – सीएसएमटी-पनवेल
11. दुपारी 1.17 – वडाळा रोड-पनवेल
12. दुपारी 3.54- सीएसएमटी-वाशी
13. संध्या. 5.30- वडाळा रोड-पनवेल
14. रात्री 8.00- सीएमएमटी-पनवेल

हार्बर रेल्वेच्या प्रवाशांनी एसी लोकल सुरु करण्याच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलंय. नव्या नियोजनानुसार गर्दीच्या वेळेत धावणारी सकाळी ९.०९ पनवेल-सीएसएमटी आणि संध्याकाळी ५.३०ची वडाळा रोड-पनवेल, रात्री ८ वाजताची सीएसएमटी-पनवेल या तीन सामान्य लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

रविवार आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल फेऱ्या रद्द राहतील. त्याऐवजी सामान्य लोकल फेऱ्या धावतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर नव्या एसी लोकल

पश्चिम रेल्वे मार्गावरही येत्या २६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर १२ एसी लोकल फेऱ्या वाढणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर नव्या एसी लोकल
अप
१. पहाटे 5.14-गोरेगाव ते चर्चगेट- धीमी
2. सकाळी 7.25- बोरिवली ते चर्चगेट- जलद
3. सकाळी 10.08- विरार ते चर्चगेट- जलद
4. दुपारी 12.44 – भाईंदर ते चर्चगेट- जलद
5. दुपारी 3.45- विरार ते चर्चगेट- धीमी
6. संध्या 7.06- गोरेगाव ते चर्चगेट- धीमी

डाऊन
1. सकाळी 6.14- चर्चगेट ते बोरिवली -धीमी
2. सकाळी 8.27- चर्चगेट ते विरार- जलद
3. सकाळी 11.30- चर्चगेट ते भाईंदर- जलद
4. दुपारी 1.52- चर्चगेट ते विरार- धीमी
5. संध्या 5.57-चर्चगेट ते गोरेगाव-धीमी
6. रात्री 8.07- चर्चगेट ते गोरेगाव- धीमी

या नव्या एसी लोकलमुळे यंदाच्या उन्हाळ्यात पश्चिम रेल्वेसह, हार्बर रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.

Follow Us :GoogleNews