Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना खूषखबर!! सरकारने दिले महत्त्वाचे आदेश

Published:
ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई केवायसी (e KYC) प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना खूषखबर!! सरकारने दिले महत्त्वाचे आदेश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांनी एक केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे ज्यांचा हप्ता थांबला आहे अशा महिलांसाठी राज्य सरकारने गुड न्यूज दिली आहे. ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई केवायसी (e KYC) प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

काय आहे अदिती तटकरे यांचे ट्विट (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना ! महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. Ladki Bahin Yojana

तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

वाशिम मध्ये महिला आक्रमक

दरम्यान, वाशिम जिल्ह्यात अनेक महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत तक्रार मांडण्यासाठी मोठ्या संख्येने महिलावर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला. वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न मिळाल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केला